शेतकऱ्याने मिरची लागवडीतून 20 गुंठ्यात कमावले 7 लाख रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील शेतकरी सध्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत आहेत. या प्रयोगाच्या माध्यमातून शेतकरी कमीत-कमी जमिनीचा वापर करत पिकाचे उत्पादन कसे वाढवता येईल यावर जास्त भर देत आहेत. पारंपरिक पद्धतींना छेद देत आधुनिक पद्धतींचा शेतीमध्ये वापर करून चांगले उत्पन्न घेत आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी रामचंद्र चोपडे यांनी वीस गुंठे क्षेत्रात कलिंगड आणि मिरची या पिकांची लागवड करून सात लाखांचे उत्त्पन्न मिळवले आहे.

स्वयंपाक घरातील माळव्यामध्ये हमखास दिसणारी मिरची शेतकऱ्यांना बारमाही उत्पन्नाची हमी देते. अनेक शेतकरी मिरची पिकातून भरघोस उत्पादन घेतात परंतु रोग किडींमुळे व चुकिच्या जमिनिच्या निवडीमुळे मिरची पिक हातून जावू शकते. तुम्हालाही याबाबत उपाय काय करावे असा प्रश्न पडला असेल आणि भरघोस उत्पन्न घ्यायचे असेल. तुम्हाला सुद्धा तुमच्या शेतात भाज्यांची किंवा फळांची लागवड करायची असेल किंवा त्यातून उत्पन्न वाढवायचे असेल त्यासाठी रोपे विकत घेताना किंवा त्याबाबतच्या माहितीबाबत अडचण येत असेल तर चिंता करू नका.

हॅलो कृषी हे मोबाईल अँप तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करा आणि तुमच्या आसपासच्या रोपवाटिका मालकाशी किंवा कृषी तज्ज्ञांशी थेट संपर्क साधा. यामाध्यमातून तुम्हाला हवी ती रोपे तुम्ही अगदी कमी खर्चात आणि महत्त्वाचे म्हणजे कमी वेळेत मिळवू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे अँप Download करून Install करा. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या जवळच्या खत दुकानदार, रोपवाटिका आणि कृषी केंद्रे यांची यादी दिसेल. याव्यतिरिक्त Hello Krushi मध्ये तुम्हाला सातबारा उतारा, जमीन मोजणी, बाजारभाव, हवामान अंदाज यांसारख्या सुविधाही मिळतील. महत्त्वाचे म्हणजे शेतकरी ते शेतकरी, शेतकरी ते छोटा व्यापारी यांना एकमेकांशी जोडणाऱ्या Hello Krushi च्या माध्यमातून तुम्ही स्वतः पिकवलेला शेतमाल तुम्हाला हव्या त्या किमतीत विकता सुद्धा येतो. त्यासाठी हॅलो कृषी डाउनलोड करा.

Hello Krushi हे अँप Download करण्यासाठी Click Here

Chilli crops

20 गुंठ्यात कलिंगड आणि मिरची

नेहमीच आपल्या शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या रामचंद्र चोपडे यांनी यावेळी आपल्या शेतात मिश्र शेतीचा प्रयोग केला. त्यांनी आपल्या शेतात २० गुंठ्यात कलिंगड आणि मिरची या दोन पिकांची लागवड केली. या पिकांना पाणी देण्यासाठी रामचंद्र यांनी ठिबकसिंचनाचा वापर केला.

Chilli crops

कारखान्यात नोकरी करत केली शेती

प्रगतशील शेतकरी रामचंद्र चोपडे हे पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी कारखान्यात नोकरी करतात. नोकरी करत असताना देखील त्यांनी शेतीची आवड जपली होती. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. त्यांनी नोकरी आणि शेतीत योग्य समतोल साधत मोठे यश मिळवले आहे.

chili farming

भाजीपाला पिकांची देखील लागवड

अल्पभूधारक शेतकरी असलेल्या रामचंद्र चोपडे यांच्याकडे चार एकर बागायती शेती आहे. शेती कमी असली तरी ते शेतीमध्ये अनेक नवनवीन प्रयोग असतात. त्यांनी असे प्रयोग करून पिकांचे उत्पादन वाढवले व नफा कमवला. रामचंद्र चोपडे आपल्या शेतात वेगवेगळ्या भाजीपाला पिकांची देखील लागवड करतात त्यातून चांगला नफा मिळतो.

मिरची लागवड

कलिंगड, मिरची लागवडीसाठी 70 हजार रुपये खर्च

रामचंद्र चोपडे यांनी लावलेल्या कलिंगड आणि मिरचीला सुरवातीला अळी व भुरी लागली होती. त्यानंतर रामचंद्र यांनी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत औषधांची फवारणी केली. वीस गुंठे क्षेत्रात कलिंगड आणि मिरची या पिकांची लागवड करण्यासाठी रामचंद्र यांना ७० हजार रुपये खर्च आला. पारंपारिक शेतीला नवीन प्रयोगाची जोड आवश्यक आहे असे केल्यास शेतकरी नक्कीच चांगले उत्पन्न घेऊ शकतो.