Farmer Suicide | शेती हा आपल्या भारतातील मुख्य व्यवसाय असला, तरी शेती करताना शेतकऱ्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. कधी कधी नैसर्गिक चक्र असे फिरतात की, शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक नुकसान होते. आणि यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या (Farmer Suicide) करत आहेत. अनेक सुविधा असल्या, तरी सगळ्यात शेतकऱ्यांपर्यंत त्या सुविधा पोहोचत नाही .आणि पर्यायाने त्यांच्याकडे आत्महत्या शिवाu दुसरा पर्याय उरत नाही. गेल्या काही वर्षापासून विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे.
पश्चिम विदर्भाच्या 6 जिल्ह्यांमध्ये 1 जानेवारी 2024 ते 10 जुलै 2024 यादरम्यान तब्बल 618 शेतकऱ्यांनी आत्महत्या (Farmer Suicide) केलेले आहेत. आता या सगळ्या गोष्टींचा केंद्र सरकारने चांगलं गांभीर्याने विचार करायला पाहिजे. तसेच बजेटमध्ये 1 लाख कोटींची एकात्मिक पश्चिम विदर्भ कृषी कल्याण कार्यक्रमाची घोषणा करावी, अशी मागणी देखील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा अभ्यास करणारे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी केलेली आहे.
किशोर तिवारी हे 2015 ते 2022 या काळात राज्य सरकारच्या वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे प्रमुख होते. त्याचप्रमाणे त्यांनी यवतमाळ, वाशिम, अमरावती, बुलढाणा, अकोला आणि वर्धा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत एकात्मिक अहवाल देखील तयार केला होता. शासनाच्या अधिकाऱ्यांनी नीट विचार केला नाही. त्यामुळे आत्महत्या सारखा गंभीर विषयी वाढत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
पश्चिम विदर्भाला पांढरे सोने म्हणून ओळखले जाते. कारण या भागात कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. 1998 पासून अनेक कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आत्महत्या (Farmer Suicide) केलेल्या आहेत. 2001 साली तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने राष्ट्रीय शेतकरी आयोगाची देखील स्थापना केली होती. मात्र यावर कोणतीही उपाययोजना केली नव्हती.
त्यानंतर 2005 मध्ये विदर्भासाठी 4800 कोटींचे शेतकरी पॅकेज देखील जाहीर करण्यात आले होते. 2008 मध्ये शेतकऱ्यांची कृषी कर्ज देखील माफ केले होते. त्यानंतर 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी शेतकरी यांच्या अडचणीच्या सर्व मुद्दे घेऊन त्यांच्यासाठी अनेक योजना आणल्या होत्या. आणि त्याबाबत आश्वासन देखील केले होते. परंतु सध्या नोकरशाहीमध्ये एवढा भ्रष्टाचार वाढलेला आहे की, या सगळ्या योजना यशस्वी ठरलेल्या आहेत.याच कारणामुळे आता अनेक शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागत आहे.