जमिनी मिळाल्या नाहीत तर आत्मदहन करणार; धोम प्रकल्पग्रस्त बाधित शेतकऱ्यांचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा तालुक्यातील रेनावळे गावचे उपसरपंच गणेश सणस यांच्यावर आमदार महेश शिंदे यांनी केलेले आरोप पूर्ण खोटे आहे. आमदारांनी याबाबत या प्रकरणाची पूर्ण माहिती घ्यावी आणि आमच्यावर आरोप करू नये. पुनर्वसनाच्या प्रश्नासाठी वारंवार शासकीय कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत आहेत याचा अर्थ दुसरा काढू नये. आमदार महेश शिंदे यांच्यामुळे जर आम्हाला जमिनी मिळाल्या नाहीत तर आम्ही आत्मदहन करू, असा इशारा धोम प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दिला. यावेळी शेतकऱ्यांच्या व सरपंच संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी धोम प्रकल्पग्रस्त सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, खणत वाटते एका गोष्टीची की, गेली ४० वर्षे झाले आम्ही आमच्या मागण्यासाठी धडपडत आहे. आमच्या मागण्यांसाठी आम्ही मंत्रालयापर्यंत गेलो आहे. मात्र, आमदारा महेश शिंदे यांनीही हे जाणले पाहिजे. कुठे तरी लोकप्रतिनिधी म्हणून आपण लोकांची कामे करत असतो. आमदारांनी आमच्याशी थेट चर्चा करणे आवश्यक आहे. आम्ही कोणी एजंट नसून आम्ही जनतेची कामे करणारे सेवक आहोत.

डोंगर भागात राहणाऱ्या लोकांना कोणत्याही स्वरूपाचा भूखंड मिळालेला नाही. एक गुंठाही जमीन मिळालेली नाही. त्यामुळे 1980 साली 12 हजार रुपयांना येथील शेतकऱ्यांनी भरून देखील त्यांना जमीन मिळालेली नाही. अशा बाधितांना त्यांचे हक्क मिळावेत म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे.