हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक विविध योजना राबवल्या जातात. या योजनांच्या मार्फत सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करत असते. परंतु केंद्र सरकारने आता अशी योजना आणली आहे ज्यात शेतकऱ्यांना अतिशय स्वस्त व्याजदरात कर्ज मिळू शकते. परंतु हे कर्ज मिळवण्यासाठी त्यांना एक अर्ज भरावा लागेल. त्यामुळेच हा अर्ज कोणता असेल?? ही सरकारची योजना कोणती आहे?? याविषयी ताबडतोब जाणून घ्या.
किसान क्रेडिट योजनलनेची (Kisan Credit Card) माहिती
एखाद्या शेतकऱ्याला मत्स्यपालन, पशुपालन किंवा शेतीशी संबंधित व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो शेतकरी किसान क्रेडिट कार्डअंतर्गत कर्ज घेऊ शकतो. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला स्वस्त व्याजदरात कर्जाची सुविधा पुरवली जाते. सरकारकडून हे कर्ज 2% ते 4% पर्यंत व्याजदरावर दिले जाते. ज्यामुळे शेतकरी हे कर्ज सहज फेडू शकतो. खास म्हणजे हे कर्ज फेडण्यासाठी हे सरकार शेतकऱ्यांना बराच वेळ देते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला विमा संरक्षण लवचिक परतफेड आणि कमी व्याजदर अशा सुविधा दिल्या जातात.
इतकेच नव्हे तर, शेतकऱ्याला स्मार्ट कार्ड, बचत खाते आणि डेबिट कार्डची ही सुविधा दिली जाते. परंतु या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला बँकेच्या शाखेत जाऊन अर्ज भरावा लागतो. त्यासाठी संबंधित शेतकऱ्याला बँकेत जाऊन क्रेडिट कार्डसाठी अर्ज घ्यावा लागतो. या अर्जामध्ये शेतकऱ्याला ॲड्रेस प्रूफ, इन्कम सर्टिफिकेट, आयडी-प्रूफ अशी कागदपत्रे जोडावी लागतात. हा फॉर्म भरल्यानंतर तो बँकेत जमा करावा लागतो. या फॉर्मची पडताळणी केल्यानंतर शेतकऱ्याला कर्ज उपलब्ध करून दिले जाते.