शेतकऱ्यांच्या मुलांनाही घेता येणार स्वाधार योजनेचा लाभ; मिळणार असा लाभ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सरकारमार्फत अनेक वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात. ज्याचा फायदा संपूर्ण विद्यार्थ्यांना होत असतो. अशातच आता आपल्या राज्याच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून एक नवीन योजना राबविण्यात आलेली आहे. ही योजना अनुसूचित जाती आणि नव-बौद्ध घटकातील शासकीय वस्तीगृहासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. या योजनेचे नाव स्वाधार योजना असे आहे. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर 30 नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.

योजना राबविणे मागची उद्दिष्टे काय आहे?

सरकारने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केलेली आहे. ही जिल्ह्याच्या ठिकाणी इयत्ता दहावी आणि बारावीच्या नंतर व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. वस्तीगृहात प्रवेश न मिळाल्याने विद्यार्थ्यांना भोजन निवास आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना चालू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी सरकारकडून अनुदान देण्यात येणार आहे.

योजनेच्या लाभाचे स्वरूप

सरकारच्या या स्वाधार योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि नवोदय घटकातील विद्यार्थ्यांना 51 हजार रुपये शिष्यवृत्ती म्हणून दिले जाणार आहेत. हे पैसे त्यांना दोन हप्त्यांमध्ये दिले जाणार आहेत तसेच वैद्यकीय आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना 5000 रुपये व इतिहास इतर अभ्यासक्रमांना 2 हजार रुपये अतिरिक्त दिले जाणार आहे.

योजनेच्या अटी

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी हा अनुसूचित जाती आणि नवोदय प्रवर्गातील असावा.
  • विद्यार्थी ग्रामीण भागातील रहिवासी असावा.
  • तो विद्यार्थी स्थानिक रहिवाशी नसावा.
  • तो विद्यार्थी नांदेड महानगरपालिकेच्या हद्दीपासून 5 km पर्यंतच्या शैक्षणिक संस्थेत प्रवेशित असावा.
  • विद्यार्थी हा बारावी किंवा त्यानंतरचे उच्च शिक्षण घेणारा असावा.
  • पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा अभ्यासक्रम हा दोन वर्षापेक्षा कमी कालावधीचा नसावा.
  • इयत्ता अकरावी मध्ये विद्यार्थ्यांना कमीत कमी 50% गुण असणे गरजेचे आहे.