व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

भाडळेत वीज पडून शेतकऱ्यांचा मृत्यू

कोरेगाव | भाडळे (ता. कोरेगाव) येथे काळवट नावाच्या शेत शिवारात वीज पडून संभाजी सीताराम निकम (वय- 60) या शेतकर्‍याचा मृत्यू झाला. कोरेगाव तालुक्यात सोमवारी दुपारी जोरदार पाऊस कोसळला. भाडळे गावात दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास वीज कोसळली होती.

भाडळे येथे जोरदार आलेला पाऊस थांबल्यानंतर काळवट नावाच्या शिवारात संभाजी निकम यांचा मृतदेह नागरिकांना दिसून आला. या घटनेची माहिती वाठार पोलिस स्टेशनमध्ये देण्यात आली आहे. संभाजी निकम यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, विवाहित मुलगी असा परिवार आहे.

दरम्यान, आ. महेश शिंदे यांना ही घटना समजल्यानंतर निकम कुटूंबियांना प्रशासकीय मदत मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले. प्रशासकीय अधिकार्‍यांना याची माहिती देत मदत मिळावी, यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना आ. शिंदे यांनी दिल्या.