Farmers | राज्यातील शेतकरी आत्महत्येचा प्रश्न कायम; गेल्या 4 महिन्यात झाल्या ‘इतक्या’ आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Farmers | आजकाल शेती करण्यासाठी नवनवीन उपकरणे, तंत्रज्ञान जरी उपलब्ध असले, तरी सर्वसाधारण शेतकरी हा मात्र शेती करण्यासाठी तितका सक्षम नाही. त्याचप्रमाणे शेती जरी नीट केली, तरी निसर्गाचे चक्र असे फिरतात की, त्याच्या संपूर्ण धान्याची नासाडी होते. यामुळे त्यांना आर्थिक फायदा होत नाही. आणि घेतलेले कर्ज त्याचप्रमाणे इतर सगळ्या गोष्टींचा विचार करून अनेक शेतकरी आजकाल आत्महत्या करायला लागलेले आहेत.

राज्यामध्ये सरकारने शेतकऱ्यांसाठी (Farmers) नवनवीन योजना आणल्या. परंतु तरीदेखील शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवणे सरकारला काही जमलेले नाही. 1986 साली यवतमाळ जिल्ह्यात आत्महत्येची पहिली नोंद झाली. यावेळी साहेबराव करपे पाटील यांनी त्यांच्या पत्नीसह आत्महत्या केल्याची नोंद आहे. आणि तेव्हापासून या आत्महत्या चक्राला सुरुवात झालेली आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांचे आत्महत्या करण्याच्या संकेत वाढ होत चाललेले आहेत.

चार महिन्यातील आकडेवारी चिंताजनक | Farmers

2024 मध्ये केवळ चार महिन्यातच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची आकडेवारी ही खूप चिंताजनक आहे. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात राज्यात जवळपास 838 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. त्याचप्रमाणे 235 आत्महत्या ह्या जानेवारीत झालेले आहे. याचप्रमाणे फेब्रुवारी 208 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. मार्चमध्ये 215 तर एप्रिलमध्ये 180 शेतकऱ्यांनी आत्महत्या झाल्याची नोंद समोर आलेली आहे. चार महिन्यांचा विचार केला तर दररोज सरासरी 7 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आलेले आहे.

अमरावती विभागात सर्वाधिक आत्महत्या

आतापर्यंत अमरावती विभागात सगळ्यात जास्त आत्महत्या झालेल्या आहेत. अमरावती विभागात 383 आत्महत्या झालेल्या आहे. त्याचप्रमाणे संभाजीनगर विभागात 264 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, तर नागपूर विभागात 84 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे.

आर्थिक मदतीसाठी प्रतिक्षा

सरकारने आत्तापर्यंत 104 शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिल्याची माहिती समोर आलेली आहे. त्याचप्रमाणे 62 शेतकऱ्यांनी आत्महत्याची प्रकरणी फेटाळण्यात आलेली आहे. तसेच 605 शेतकरी आत्महत्या प्रकरणांमध्ये कागदपत्रांची तपासणी सध्या सुरू झालेली आहे.