शेतकऱ्यांनो.., नापीक जमिनीत डिझेल प्लांटची करा लागवड, काही दिवसातच व्हाल करोडपती; जाणून घ्या शेतीबद्दल…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Business Idea : सध्या देशात मोठ्या प्रमाणात शेतकरीवर्ग आहे. बळीराजा शेतीतून अनेक वेगवेगळ्या पिकांची लागवड करत उत्पन्न मिळवत असतो. अशा वेळी जर तुमच्याकडेही शेती असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम शेती घेऊन आलो आहे. या शेतीतून तुम्ही करोडपती होऊ शकता. दरम्यान, आम्ही तुम्हाला जट्रोफा किंवा रतनजोत याच्या शेतीबद्दल सांगणार आहे. याला डिझेल प्लांट देखील म्हणतात. त्याच्या लागवडीतून शेतकरी श्रीमंत होत आहेत.

या पिकाची लागवड करण्यासाठी उत्तम दर्जाची जमीन असावे असे काही नाही. कारण तुम्ही याची लागवड नापीक जमिनीत करू शकता. जास्त मेहनत न करता तुम्ही या शेतीतून वर्षाला लाखो रुपये सहज कमवू शकता. त्याचे बियाणेही बाजारात सहज उपलब्ध आहे. या रोपाला जास्त पाणी आणि शेताची नांगरणी करावी लागत नाही. केवळ 4 ते 6 महिन्यांसाठी काळजी घेणे आवश्यक आहे. नंतर ही वनस्पती पाच वर्षांसाठी बियाणे देईल.

डिझेल प्लांट किंवा जट्रोफा म्हणजे काय?

जट्रोफा ही एक झुडूप असलेली वनस्पती आहे जी अर्ध-शुष्क भागात वाढते. या वनस्पतीच्या बियांपासून 25 ते 30 टक्के तेल काढता येते. या तेलाचा वापर करून कार इत्यादी डिझेल वाहने चालवता येतात. त्याच्या उरलेल्या अवशेषांपासून वीज निर्माण करता येते. हे एक सदाहरित झुडूप आहे.

प्रामुख्यानेया पिकाची लागवड उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात याची लागवड केली जाते. जट्रोफा वनस्पती रोपांपासून बनवली जाते. मग त्याची रोपे शेतात लावली जातात. त्याच्या लागवडीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ती एकदा शेतात लावली की पाच वर्षांपर्यंत पीक सहज मिळू शकते.

जट्रोफाच्या बियाण्यापासून डिझेल कसे मिळते?

जट्रोफा वनस्पतीपासून डिझेल बनवण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. सर्वप्रथम जट्रोफा वनस्पतीच्या बिया फळांपासून वेगळे कराव्या लागतात. यानंतर बिया पूर्णपणे स्वच्छ केल्या जातात. ते नंतर मशीनमध्ये टाकले जातात. ही प्रक्रिया मोहरीपासून तेल काढण्याच्या प्रक्रियेसारखीच आहे.

जट्रोफाच्या मागणीत वाढ होत आहे.

सध्या देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशा वेळी भारत सरकारही शेतकऱ्यांना या पिकाच्या लागवडीसाठी मदत करत आहे. एक हेक्टर जमिनीवर सरासरी 8 ते 10 क्विंटल बियाणे तयार होते. सरकार 12 रुपये प्रतिक्विंटल दराने बियाणे खरेदी करते. बाजारात 1800 ते 2500 रुपये प्रतिक्विंटल दराने विकली जाते.अशा प्रकारे तुम्ही या शेतीतून बंपर कमाई करू शकता.