खुशखबर! आज शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांच्या आनंदात आणखीन भर होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज झारखंड येथे दौरा करतील. यावेळीच त्यांच्या हातून शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेची रक्कम जमा करण्यात येईल. परंतु ज्या शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधार कार्डसोबत लिंक केलेले नाही, त्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही. पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एका वर्षात सहा हजार रुपये तीन टप्यात देण्यात येतात.

सध्या, राज्यातील लाखो शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत. परंतु या योजनेतील काही नियमांमध्ये बदल केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. आज या योजनेचा 15 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल. म्हणजेच पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 हजार रुपये वितरित करतील. परंतु ज्या शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. तसेच, ज्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नाही अशा शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार नाही.

पीएम किसान योजनेची माहिती (PM Kisan Yojana)

देशातील कोट्यावरी शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून पीएम किसान योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सरकार दरवर्षी 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करते. परंतु ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर तीन टप्प्यात पाठविण्यात येते. यापूर्वी या योजनेचा लाभ फक्त 2 हेक्टरपेक्षा कमी जागेची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना घेण्यात येत होता. परंतु आता या योजनेचा विस्तार करण्यात आल्यामुळे कोट्यावरी शेतकरी योजनेचा भाग झाले आहेत. विशेष बाब म्हणजे, आता 2 हेक्टर क्षेत्राची अट सरकारने योजनेतून काढून टाकली आहे.