सरकारची मोठी योजना; ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकऱ्यांना मिळणार 50 टक्क्यांपर्यंत अनुदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल आधुनिक पद्धतीने शेती केली जाते. यांत्रिकीकरणाचा प्रभाव वाढल्यामुळे यंत्राच्या माध्यमातून शेती केली जाते. त्यामुळे आता यंत्राच्या साह्याने शेतीतील अवघड कामे कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी खर्चात होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा खूप जास्त फायदा होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ देखील वाचत आहे आणि चांगले उत्पन्न देखील येत आहे. सरकार नेहमीच शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असतात. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना होत असतो. शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात ही आर्थिक मदत सरकारकडून मिळते.

आपण जर यांत्रिकीकरणाच्या दृष्टिकोनातून पाहिले, तर ही कृषी यांत्रिकीकरण ही शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत सरकारकडून शेतकऱ्यांना काही अवजारे खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते. आणि याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे आता राज्य सरकारने 2024-25 या वर्षातील राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण या योजनेसाठी तब्बल 27 कोटी 75 लाख रुपयांच्या निधी वितरणाला मान्यता दिलेली आहे. 27 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत ही मान्यता दिलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी यंत्रे खरेदी करण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत केली जाणार आहे.

ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी किती अनुदान मिळणार ?

राज्य सरकारच्या या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी महिला शेतकरी यांना ट्रॅक्टर किमतीच्या 50 किंवा एक लाख 25 हजार रुपयांपर्यंत जी रक्कम कमी असेल तेवढी रक्कम अनुदान म्हणून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे इतर शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपाच्या ट्रॅक्टरच्या एकूण किमतीच्या 40% रक्कम किंवा 1 लाख रुपये या दोन्ही रकमेपेक्षा जी रक्कम कमी असेल. तेवढी रक्कम दिली जाणार आहे. त्यामुळे आता कोणत्याही प्रकारचे शेतकरी हे ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी सरकारकडून अनुदान मिळवू शकतात.

लाभार्थ्याची निवड कशी होणार?

राज्य सरकारच्या या कृषी यांत्रिकीकरण योजनेतून लाभार्थ्याची निवड ही महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत ज्यांची निवड होईल त्यांना अनुदानाची कमी आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. त्यामुळे आता शेतकरी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी अगदी सहज पद्धतीने सरकारकडून अनुदान मिळवू शकतात. आणि शेतीतील कामे अत्यंत जलद गतीने कमी वेळात आणि कमी खर्चात करू शकतात.