केंद्र सरकारची जबरदस्त योजना!! शेतकऱ्यांना दरमहा मिळणार 3 हजार रुपये पेन्शन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| केंद्र सरकार विविध स्तरातील नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना आणत आहे. या योजना नागरिकांना लाभदायी ठरत आहेत. केंद्र सरकारने महिलांसाठी विविध बचत योजना आणली आहे. तसेच ज्यांना लघु उद्योग काढायचा आहे, अशा लोकांसाठी केंद्र सरकारने अनेक योजना आणल्या आहेत. देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने योजना आणली आहे. ज्यांना कमी क्षेत्राची शेती आहे, त्यांच्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान योजना आणली आहे. या योजनेमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे आयुष्य सुखी जाणारा आहे किंवा त्याला दिलासा मिळणार आहे.

अनेक शेतकरी शेती करतात. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसून शेतकर्याचे आयुष्य उध्वस्त होऊ शकते. याचाच विचार करून प्रधानमंत्री किसान मानधन योजना केंद्र सरकारने आणली आहे. कामाकुवर, आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या असलेल्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ होणार आहे. अनेक शेतकरी ठराविक वयापर्यंत शेती करतात आणि त्यांचे वय झाले की, त्यांना आर्थिक प्रश्न भेडसावतात. शेतकऱ्यांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना आणली आहे. या योजनेत काही रक्कम गुंतवली की, वयाच्या 60 वर्षानंतर शेतकऱ्याला 3000 रुपये पेन्शन दरमहा मिळते. काय आहे प्रधानमंत्री किसान मानधन योजना हे आपण पाहणार आहोत.

या योजनेत 18 ते 40 या वयोदरम्यानचे शेतकरी गुंतवणूक करू शकतात. प्रधानमंत्री किसान मानधन योजनेत रक्कम गुंतवताना वयानुसार रक्कम भरावी लागते. गुंतवणुकीची रक्कम 55 ते 200 रुपये अशी आहे. शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षानंतर पेन्शन सुरु होणार आहे. ज्यावेळी शेतकर्याची शारीरिक स्थिती कमजोर होईल तेव्हा ही पेन्शन कामी येईल. वयाच्या 18 व्या वर्षी प्रीमियम भरणाऱ्या शेतकऱ्याला 55 रुपये भरावे लागतील. वयाच्या 60 व्या वर्षानंतर शेतकऱ्याला दर महिन्याला 3000 रुपये महिना मिळतील. म्हणजे वार्षिक 36,000 रुपये शेतकऱ्याला मिळणार आहेत. प्रधानमंत्री किसान योजनेतील लाभार्थ्याचा मृत्यु झाल्यास त्याच्या पत्नीला निम्मे मानधन म्हणजे 1500 रुपये दरमहा मिळणार आहेत. प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांची जमीन 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त आहे, असे शेतकरी पात्र ठरणार आहेत.