Wednesday, February 1, 2023

‘या’ माणसाची गिनीज बुकने घेतली दखल, 1 मिनिटात वाजविल्या एवढ्या टाळ्या

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये एका वेगळ्या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये एका तरुणाने एका मिनिटात 1140 टाळ्या (claps) वाजवल्या. याचाच अर्थ एका सेकंदात 19 टाळ्या (claps) वाजवण्याचा विक्रम या मुलाने केला आहे. त्याचा व्हिडिओ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर पोस्ट करण्यात आला आहे.

या तरुणाचे नाव डाल्टन मेयर असे असून तो अमेरिकेचा रहिवाशी आहे. या मुलाने एका मिनिटात 1140 टाळ्या (claps) वाजवल्यात. डाल्टन मेयरने हा रेकॉर्ड बनवण्यासाठी मनगटी वाल्या क्लॅपिंग तंत्राचा वापर केला आहे. या तंत्रात मनगट आणि बोटांचा वापर करून दुसऱ्या हाताच्या तळहातावर टाळी वाजवावी लागते. या तरुणाने मार्च महिन्यातच हा अनोखा विश्वविक्रम केला होता.

- Advertisement -

या विक्रमाला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने आता मान्यता दिली आहे. या विक्रमाला अधिकृत मान्यता मिळाली असून या विक्रमाचा समावेश गिनीज बुकात करण्यात आला आहे. या अगोदर एका मिनिटात सर्वाधिक टाळ्या (claps) वाजवण्याचा विक्रम एली बिशप यांच्या नावावर होता, त्यांनी एका मिनिटात 1103 वेळा टाळ्या वाजवण्याचा विक्रम केला होता.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!