20 जानेवारी रोजी मुंबईत आमरण उपोषण करणार; जरांगे पाटलांची मोठी घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा पार पडली. या सभेतून त्यांनी थेट राज्य सरकारला इशारा दिला. त्याचबरोबर यावेळी एक मोठी घोषणा करत मराठ्यांचे पुढचे आंदोलन आता थेट मुंबईतील आझाद मैदानावर होणार अशी माहिती दिली. इतकेच नव्हे तर, येत्या 20 जानेवारी रोजी मुंबईत आमरण उपोषणाला बसणार असल्याची मोठी घोषणा देखील मनोज जरांगे पाटील यांनी केली.

बीडच्या सभेत बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, “मराठा समाजाने शांततेत आंदोलन करावी, सरकारला खूप वेळ दिला. मुंबईत जाताना कुणी हिंसा करु नये. ३ कोटी मराठे मुंबईत येणार आहेत. जो हिंसा करेल तो आपला नाही”

त्याचबरोबर, “राज्य सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी, आमच्यावर डाव टाकू नये. आता आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही. आझाद मैदान, शिवाजी पार्क येथे आमरण उपोषण होणार आहे. फक्त मराठा समाजाला डाग लागला नाही पाहीजे.. एवढी काळजी घ्यावी, आता मराठ्यांनी मुंबईला जाण्याची जोरदार तयारी करावी” असे आवाहन देखील जरांगे पाटील यांनी केले.

दरम्यान, “सरकारनं मराठ्यांना नोटीसा दिल्या आणि मुंबईत 18 जानेवारीपर्यंत 144 कलम लागू केलं आहे. त्यामुळे 20 जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण करण्यात येईल. 20 जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानावर मी आमरण उपोषण करणार आणि मला भेटण्यासाठी मराठे येतील” अशी घोषणा बीडच्या सभेत बोलताना जरांगे पाटील यांनी केली.