FASTag : आज दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी सर्व सामान्य माणसाच्या जीवनावर परिणाम करेल असा महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे. होय आम्ही बोलत आहोत FASTag वापरकर्त्यांबद्दल. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एमपीसीएल टोल वसुलीसाठी नवीन नियम जाहीर केले आहेत आणि हे नवे नियम आजपासूनच लागू होणार आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नियमांचे पालन केलं नाही तर वापरकर्त्यांना दुप्पट टोल शुल्क भरावा लागू शकतो त्यामुळे चला जाणून घेऊयात हे नियम नक्की काय आहेत.
आजपासून हे महत्वाचे नियम लागू (FASTag)
- जर FASTag स्कॅन करण्यापूर्वी 60 मिनिटांपर्यंत ब्लॅकलिस्ट केले असेल, तर पेमेंट प्रक्रिया केली जाणार नाही.
- वापरकर्त्यांना त्यांच्या FASTag स्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी 70 मिनिटांचा कालावधी असेल.
- कमी बॅलन्स किंवा तांत्रिक समस्यांमुळे ब्लॅकलिस्टेड झाल्यास, वापरकर्त्यांना त्यांचे खाते रिचार्ज करण्यासाठी 70 मिनिटे मिळतील.
- ज्या वाहनांवर FASTag बॅलन्स नकारात्मक आहे त्यांना टोल प्लाझामधून जाण्याची परवानगी असेल. अशा परिस्थितीत, टोल शुल्क सुरक्षा ठेवीतून वजा केले जाईल.
- सुरक्षा ठेवीतून कोणतीही वजावट पुढील रिचार्जवर परत केली जाईल.
तुमचे FASTag ब्लॅकलिस्ट मध्ये केव्हा जाईल (FASTag)
जर तुमच्या FASTag च्या अकाउंट मध्ये अपुरी शिल्लक असेल, टोल टॅक्स (FASTag) भरलेला नसेल, पेमेंट अयशस्वी झालेले असेल किंवा तुमचे केवायसी अपडेट नसेल किंवा वाहनाच्या चेसेस नंबर आणि नोंदणी क्रमांक मध्ये जर तफावत आढळून आली असेल तर तुमचा फास्टट्रॅक हा ब्लॅकलिस्ट होऊ शकतो.
हे नक्की करा (FASTag)
- FASTag वॉलेटमध्ये पुरेसा बॅलन्स ठेवा.
- किमान 100 रुपये शिल्लक असल्याची खात्री करा.
- बँकेकडून येणाऱ्या एसएमएस अलर्ट आणि सूचनांकडे लक्ष द्या.
- MyFASTag अॅपद्वारे नियमितपणे FASTag बॅलन्स आणि स्टेटस तपासा.
- अखंड व्यवहारांसाठी ऑटो-रिचार्ज वैशिष्ट्य सक्षम करा.
- नोंदणीकृत मोबाईल नंबर अपडेट ठेवा.
- वाहनाच्या विंडशील्डवर FASTag स्टिकर योग्यरित्या चिकटवा.
- समस्या टाळण्यासाठी प्रत्येक वाहनात फक्त (FASTag) एकच फास्टॅग वापरा.