Fastag New Rule : आजपासून Fastag चे नियम बदलले; प्रवास करण्यापूर्वी बातमी वाचाच

Fastag New Rule
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Fastag New Rule । तुम्हीही तुमची चारचाकी गाडी घेऊन इकडे तिकडे कुठे फिरत असाल तर हि बातमी खास तुमच्यासाठीच आहे. आजपासून म्हणजे १५ नोव्हेंबर पासून Fastag बाबत नवा नियम नियम लागू होणार आहे. फास्टॅग सिस्टिममध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी आणि डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने टोल पेमेंटच्या स्ट्रक्चरमध्ये सुधारणा केली आहे. आता तुम्ही गुगल पे किंवा फोनपे च्या माध्यमातून सुद्धा टोल नाक्यावर पेमेन्ट करू शकता. हा नियम देशभरातील वाहनचालकांसाठी लागू असेल.

केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग शुल्कनियम 2008 मध्ये सुधारणा करत टोल पेमेंट करण्यासाठी युपीआय एप्लीकेशनच्या वापराला परवानगी दिली आहे. यापूर्वी टोल भरण्याचे दोनच पर्याय उपलब्ध होते. एक म्हणजे रोख रक्कम आणि दुसरा पर्याय म्हणजे Fastag …. परंतु आता यूपीआयच्या माध्यमातून वाहन चालकांना टोल भरण्याचा तिसरा पर्याय (Fastag New Rule) आजपासून मिळणार आहे. खरं तर काही वर्षांपासून भारत सरकारने टोल नाक्यावर Fastag हि संकल्पना आणल्यापासून फास्टॅगने टोल भरला जातो. परंतु समजा काही कारणास्तव किंवा अडचणीमुळे तुमचं Fastag चालत नसेल तर वाहनचालकाला रोख रक्कम द्यावी लागते. महत्वाची बाब म्हणजे हि रक्कम टोलच्या दुप्पट असते.

वाहनचालकांना कसा फायदा होणार- Fastag New Rule

उदाहरणार्थ जर १०० रुपयांचा टोल असेल आणि तुमचा Fastag चालत नसले तर तुम्हाला दंड म्हणून २०० रुपये भरावे लागायचे. आता मात्र ऑनलाईन पेमेंट म्हणजेच फोन पे, गुगल पे च्या माध्यमातून ऑनलाईन पैसे भरण्याचा नियम लागू केल्याने वाहनचालकांचे पैसे वाचणार आहेत. कारण दुप्पट टोल देण्यापेक्षा तुम्ही फोन पे किंवा गुगल पे च्या किंवा इतर यूपीआय माध्यमातून २५ टक्केच अतिरिक्त रक्कम भरू शकता. म्हणजेच काय तर २०० रुपये भरण्याऐवजी तुम्ही १२५ रुपयात टोल भरू शकता. या नव्या नियमांमुळे वाहनचालकांच्या पैशाची बचत होणार आहे.