Fastag : 3000 रुपयांचा Fastag फक्त याच मार्गावर चालणार; प्रवासाआधी बातमी वाचाच

Fastag
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Fastag । केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी FASTag बाबत सर्वात मोठी घोषणा करत राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी आता ३००० रुपयांचा वार्षिक पास देणार असल्याचं जाहीर केलं होते. या वार्षिक पासच्या आधारे तुम्ही संपूर्ण वर्षभर किंवा २०० फेऱ्यांपर्यंत प्रवास करू शकता असं नितीन गडकरींनी सांगितलं होत. मात्र ३००० रुपयांचा हा Fastag फक्त राष्ट्रीय महामार्गावरच चालणार आहे. तुम्ही समृद्धी महामार्ग किंवा अटल सेतूवरून किंवा अन्य कोणत्या राज्य महामार्गाने प्रवास केल्यास हा पास वैध ठरणार नाही.

वार्षिक पास फक्त राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) द्वारे चालवल्या जाणाऱ्या महामार्ग आणि एक्सप्रेसवेवर वैध असेल. राज्य सरकारांद्वारे देखभाल केलेल्या मार्गांवर तो स्वीकारला जाणार नाही, त्यामुळे अतिशय कमी प्रवाशांना या ३००० रुपयांच्या पासचा फायदा होईल. खास करून आपल्या महाराष्ट्रात, ज्याठिकाणी ८७ टोल प्लाझांपैकी फक्त १८ टोल प्लाझावर हा पास वैध ठरेल. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, अटल सेतू किंवा इतर राज्य एक्सप्रेसवेवर हा पास स्वीकारला जाणार नाही. त्यामुळे प्रवाशांना फार मोठा फायदा होईल असं चित्र नाही.

Fastag च्या अटीही जाणून घ्या – Fastag

दुसरी बाब म्हणजे Fastag वार्षिक पासमध्ये अटी आहेत. जसं कि FASTag खात्यात नेहमीच ₹२०० ची किमान शिल्लक ठेवणे आवश्यक आहे, तसेच ३,००० रिफंड होऊ शकत नाहीत असं बोललं जातंय. जर एखादा प्रवासी राष्ट्रीय महामार्गावरून क्वचितच प्रवास करत असेल आणि त्याने fastag चा वार्षिक पास काढला तर त्याची ही गुंतवणूक वाया जाण्याचीही चिन्हे आहेत, कारण तो त्याप्रकारे वापरच करणार नाही. आणखी एक गोष्ट म्हणजे पास वाहनाच्या विद्यमान RFID-आधारित FASTag शी जोडलेला असेल आणि वाहन पात्र NHAI टोल प्लाझापासून ६० किमी अंतरावर आल्यावर स्वयंचलितपणे सक्रिय होईल.आणि ज्या वाहनांचे FASTag फक्त त्यांच्या चेसिस क्रमांकांवर नोंदणीकृत आहेत ते पात्र राहणार नाहीत.

दरम्यान, वाहनाची पात्रता आणि वाहनाला जोडलेल्या फास्टॅगची पडताळणी केल्यानंतरच नवीन वार्षिक पास मंजूर केला जाईल. पास मंजूर झाल्यानंतर, वाहनधारकाला ‘राजमार्ग यात्रा’ मोबाइल अ‍ॅप किंवा एनएचएआयच्या वेबसाइटद्वारे वर्ष २०२५-२०२६ साठी ३,००० रुपये भरून पास खरेदी करता येईल. ३ हजार रुपये भरल्यानंतर, नोंदणीकृत फास्टॅगवर वार्षिक पास अ‍ॅक्टिव्हेट केला जाईल आणि वाहनधारकाला पासबद्दल एसएमएस अपडेट्स मिळतील.