हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पुण्याहून शेगावकडे (Pune To Shegaon) निघालेल्या परिवहन महामंडळाच्या बसचा भीषण अपघात (Accident News) झाला आहे. आज पहाटेच्या वेळी बुलढाणातील चिखली – देऊळगाव राजा रोडच्या रामनगर फाट्यावर ही भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातामध्ये बसमध्ये असलेले 18 प्रवासी जखमी झाले आहेत. तर आठ प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या सर्व प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघात कसा घडला? (Accident News)
आज पहाटेच्या वेळी परिवहन महामंडळाची बस पुण्याहून शेगावकडे निघाली होती. परंतु ही बस रामनगर फाट्याजवळ आली असतानाच तिने समोर जात असलेल्या खाजगी बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. परंतु या प्रयत्नात बस थेट ट्रकला जाऊन धडकली. त्यामुळेच हा भीषण अपघात (Accident News) घडला. यावेळी बसमध्ये 20 ते 22 प्रवासी होते. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यांनी तातडीने बसमध्ये असलेल्या सर्व प्रवाशांना बाहेर काढले. तसेच गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात हलवले.
सांगितले जात आहे की, रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या आठ प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. तसेच या अपघातामुळे बसचे मोठे नुकसान झाले आहे. दुसऱ्या बाजूला पोलीस या सर्व घटनेचा तपास करीत आहेत. दरम्यान, राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी सरकारने महामार्गासंबंधीत विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. यातीलच एक महत्त्वाचा प्रकल्प तो म्हणजे बुलढाण्यात साकारण्यात येणाऱ्या भक्तिमार्गाचा आहे. हा महामार्ग मातृतीर्थ सिंदखेड राजा ते संतनगरी शेगाव असा 109 किलोमीटर असा असणार आहे.
भक्तीमार्गाचे वैशिष्ट्य
या महामार्गाचे वैशिष्ट्ये सांगायचे झाले तर, हा महामार्ग 109 किलोमीटर असेल. भक्तीमार्ग बुलढाणा जिल्ह्यातील पाच तालुक्यातून जाईल. या मार्गामुळे शेगाव तीर्थस्थान समृद्धी महामार्गाला जोडले जाईल. हा महामार्ग ऐतिहासिक स्थळांना जोडण्यात आल्यामुळे याला भक्तीमार्ग असे नाव देण्यात आले आहे.