सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला; रस्त्यावर अडवून रॉडने मारहाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि सुप्रसिद्ध मराठी लेखक हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात हेरंब कुलकर्णी यांना गंभीर दुखापत झाली आहे. शनिवारी दुपारी 12:18 मिनिटांनी शाळेतून परत येताना तीन अज्ञात तरुणांनी त्यांची गाडी अडवून त्यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. या घटनेप्रकरणी हेरंब कुलकर्णी यांच्या कुटुंबाने तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची माहिती स्वतः हेरंब कुलकर्णी यांच्या पत्नी प्रतिमा कुलकर्णी यांनी एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी हेरंब कुलकर्णी आपल्या मित्राच्या गाडीवर बसून शाळेतून परत घरी येत होते. यावेळेसच अहमदनगर येथील रासने नगरजवळ असलेल्या जोशी क्लासेसजवळ तीन तरुणांनी त्यांची गाडी अडवली. यानंतर त्यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. या मारहाणीत आरोपी तरुणांनी हेरंब कुलकर्णी यांच्या दोन्ही हातावर पाठीवर आणि डोक्यात रॉडने वार केले. ज्यामुळे कुलकर्णी यांच्या डोक्याला 4 टाके पडले आहेत. डोक्यावरचा दुसरा फटका सुनिल कुलकर्णी यांनी हाताने अडवला त्यामुळे हेरंब कुलकर्णी यांचे प्राण वाचले.

https://www.facebook.com/100016910384541/posts/pfbid0SuJvDjcTcVQcRTWJnCNPHZgNLN4KkCcKeC8vbhvQG9uDwCobqKoUcgWvrGvDejw1l/?app=fbl

या सर्व घटनेनंतर ताबडतोब हेरंब कुलकर्णी यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुख्य म्हणजे या सर्व घटनेनंतर हेरंब कुलकर्णी यांच्या पत्नीने पोलीसांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हणले आहे की, अद्याप या 48 तासात पोलिसांनी कोणालाही अटक केली नाही की अजूनही CCTV फॉलोअप घेतला नाही. एका सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तीला रस्त्यात अडवून रॉडने जीवघेणा हल्ला करणे हे खूप उद्विग्न करणारे आहे. आपण सर्वांनी शासनाकडे या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधावे.

दरम्यान, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला का करण्यात आला हे अद्याप समोर आलेले नाही. सध्या या घटनेचा सोशल मीडियाच्या माध्यमातून तीव्र निषेध नोंदवला जात आहे. हेरंब कुलकर्णी हे सुप्रसिद्ध लेखक असून त्यांची अनेक पुस्तके गाजलेली आहेत. ज्यामध्ये, दारिद्र्याची शोधयात्रा, अस्वस्थ क्षणांच्या नोंदी, आमच्या शिक्षणाचं काय? अशा पुस्तकांचा समावेश आहे.