व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्याच्या घरावर जीवघेणा हल्ला

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा मुमताज मुलाणी यांचे घर व हॉटेलवर हल्ला करण्यात आला. बेकायदेशीर दारू विक्रेते बाळासाहेब माने व त्यांच्या कुटुंबीयांनी मुलाणी यांच्या घरावर खुनी हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच चारचाकी गाडीची तोडफोड व चिकन सेंटरच्या दुकानाची तोडफोड करून अश्लील लज्जास्पद शिवीगाळ करून, जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे म्हटले आहे. सदरील घटनेची नोंद पुसेगाव पोलीस स्टेशनला स्वतः मुमताज मुलाणी व त्यांचे पती हुसेन गुलाब मुलाणी यांनी दिली आहे.

याबाबत पुसेगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ललगुण (ता. खटाव) येथे काल (दि. 18) रोजी सायंकाळी सहा वाजता गुरुकृपा हॉटेल लॉजवर बेकायदेशीर दारू व गैरप्रकार चालत असल्याने, हे प्रकार बंद व्हावेत. यासाठी मी वारंवार तक्रारी दिल्या कारणाने, या तक्रारीचा राग मनात धरून गुरुकृपा हॉटेल व लॉजचे मालक बाळासाहेब माने, अजित माने, संभाजी माने, इंदुबाई माने, मेघा माने, मयूर माने असे सर्वजण मिळून आठ ते दहा जणांनी लज्जास्पद शिवीगाळ केली.

बंगल्यासमोर उभे राहून रस्त्यावरील दगड, विटा उचलून व काट्या घेऊन माझ्या चिकन सेंटरच्या दुकानाची तसेच कार क्रमांक (एमएच- 12 एचझेड- 1917) या गाडीची पाठीमागील भागावर संपूर्ण तोडफोड केली आहे. तसेच आमच्या दिशेने मोठी दगडफेक करून जीवघेणा हल्ला केला आहे. एवढ्यावरच हे थांबले नसून चिकनच्या दुकानाची साहित्याची मोडतोड करून इतरत्र फेकून दिले. घरावर विटा व दगडांची दगडफेक करून बंगल्याची मोडतोड करण्याचा प्रयत्न केला आहे, असे तक्रारीत नमूद केले आहे.