FD Investment Plan | डोळे झाकून करू नका ‘फिक्स डिपॉझिट’; लक्षात ठेवा या गोष्टी, अन्यथा बसेल आर्थिक फटका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |अनेक लोक हे नोकरी करत असताना त्यांच्या भविष्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा त्यांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी काही ना काही बचत करून ठेवत असतात. लोक त्यांच्या मिळकतीचा काही हिस्सा हे कोणत्या ना कोणत्या योजनेमध्ये गुंतवत असतात. आता गुंतवणूक करण्यासाठी बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अनेक लोक बँकेतील FDमध्ये (FD Investment Plan) देखील गुंतवणूक करतात. परंतु अनेकांचे असे म्हणणे आहे की, एफडीमध्ये चांगले व्याजदर मिळत नाही.

परंतु जर तुम्ही बँकेचे नियम नीट समजून घेतले आणि चांगल्या पद्धतीने FDमध्ये पैसे गुंतवले तर तुम्हाला त्यातून खूप चांगला परतावा मिळू शकतो. परंतु FD (FD Investment Plan) करताना तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता झाल्यानंतर तुम्ही FDकरा. त्यातून तुम्हाला खूप फायदा होईल आता आपण अशा काही गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत. ज्या गोष्टींची माहिती तुम्हाला FD करण्यापूर्वी माहीत असणे गरजेचे आहे.

मुदत ठेव काळ

FD करताना आपण सगळ्यात आधी त्याचा गुंतवणुकीचा काळ लक्षात घेणे खूप गरजेचे असते. म्हणजे आपण जर दीर्घकाळासाठी ही FD केली आणि अचानक आपल्याला कोणतीही आपत्कालीन परिस्थिती आली. आपण जर FD मधून पैसे काढायचे म्हटले तर आपल्याला त्यासाठी दंड भरावा लागतो.FDवर एक टक्क्यापर्यंत दंड भरावा लागतो त्यामुळे तुमच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन तुम्ही कमी काळासाठी FD करा.

सर्व पैसे एकाच एफडीमध्ये अडकवू नका | FD Investment Plan

तुम्ही जर बँकेत 10 लाख रुपये करण्याचा विचार करत असेल. तर तुम्ही दहा लाखाची एकच FD करू नक. एक तर तुम्ही 1 लाखाच्या दहा FDकरा किंवा 50 लाखाच्या दोन FD करा. या एफडी तुम्ही वेगवेगळ्या बँकेत देखील करू शकता. त्यामुळे जर तुम्हाला पैशाची गरज भासली, तर थोड्या प्रमाणात FD मोडून पैशाची व्यवस्था करता येईल. आणि उर्वरित पैसे तुमच्या एफडीमध्ये सुरक्षित राहतील.

रक्कम काढू नये

या आधी बँकांमध्ये त्रैमासिक किंवा वार्षिक आधारावर व्याज काढण्याचा पर्याय होता. पण आता काही बँकांमध्ये तसे पैसे काढता येत नाही. म्हणून गरजेनुसार एखाद्या व्यक्तीला मासिक व्याजाचाही लाभ मिळतो. परंतु तसे रक्कम काढण्याची चूक करू नका, अन्यथा नंतर तुम्हाला कमी लाभ होईल.

FD वरील कर्जाचा व्याजदर तपासा

मुदत ठेवीवर कर्जाची देखील सुविधा होत्या. या अंतर्गत तुम्ही FDच्या गुंतवणुकीच्या 90% पर्यंत कर्ज घेऊ शकता. म्हणजे जर समजा तुमच्या दीड लाखाची असेल तर एक लाख 35000 रुपये पर्यंतचे कर्ज तुम्हाला मिळते. तसेच मुदत ठेवीवरील व्याजापेक्षा एक ते दोन टक्के जास्त व्याज द्यावे लागेल. म्हणजे तुमच्या एफडीवर 6 टक्के व्याज मिळत असेल, तर त्या कर्जासाठी तुम्हाला 7 ते 8 टक्के व्याजदराने कर्ज मिळू शकते.