हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (FD Rates For Senior Citizens) भविष्याची आर्थिक सुरक्षा लक्षात घेऊन आजकाल प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या योजनांमध्ये गुंतवणूक करत आहे. गुंतवणूक करतेवेळी गुंतवणूकदार कायम सुरक्षितता आणि परताव्याची हमी या दोन गोष्टींची पडताळणी करतो. देशभरातील अनेक गुंतवणूकदार एफडीमध्ये गुंतवणूक करणे विशेष पसंत करतात. खासगी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील अनेक बँका ज्येष्ठ नागरिकांना ३ वर्षांच्या एफडीवर ७.७५% व्याज देत आहेत. अशातच, आज आम्ही तुम्हाला काही अशा बँकांची माहिती देणार आहोत ज्या एफडीवर सर्वाधिक परतावा देत आहेत. खास करून याचा विशेष लाभ ज्येष्ठ नागरिकांना होतोय. आता तो कसा? हे जाणून घेऊया.
स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया (FD Rates For Senior Citizens)
स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया या दोन्ही बँक ज्येष्ठ नागरिकांना ३ वर्षांच्या एफडीवर ७.२५% व्याजदर देतात. त्यानुसार, ज्येष्ठांनी ३ वर्षांसाठी १ लाख रुपये गुंतवले तर त्याचे १.२४ लाख रुपये होतील.
HDFC बँक, ICICI बँक आणि PNB
HDFC बँक, ICICI बँक आणि PNB बँकेत ज्येष्ठ नागरिकांसाठी ३ वर्षांच्या एफडीवर ७.५०% व्याजदर दिला जातोय. (FD Rates For Senior Citizens) यानुसार ज्येष्ठांनी ३ वर्षांसाठी गुंतवलेले १ लाख रुपये १.२५ लाख रुपये होतील.
बँक ऑफ बडोदा
बँक ऑफ बडोदामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी ३ वर्षांच्या एफडीवर ७.७५% इतका व्याजदर दिला जात आहे. अर्थात ज्येष्ठांनी या बँकेत एफडीमध्ये ३ वर्षांसाठी १ लाख रुपये गुंतवले तर त्याचे १.२६ लाख रुपये होतील.
ॲक्सिस बँक
ज्येष्ठ नागरिकांसाठी ॲक्सिस बँक ३ वर्षांच्या एफडीवर ७.६०% इतका व्याजदर देते. (FD Rates For Senior Citizens) यानुसार ज्येष्ठांनी ॲक्सिस बँकेत एफडीमध्ये ३ वर्षांसाठी १ लाख रुपये गुंतवले तर त्याचे १.२५ लाख रुपये होतील.
कॅनरा बँक
कॅनरा बँक ही ज्येष्ठ नागरिकांना ३ वर्षांच्या एफडीवर ७.३०% इतका व्याजदर देते. त्यानुसार, ज्येष्ठ नागरिकांनी या बँकेत ३ वर्षांसाठी १ लाख रुपये गुंतवले तर त्याचे १.२४ लाख रुपये होतील.
युनियन बँक ऑफ इंडिया
युनियन बँक ऑफ इंडियाकडून ज्येष्ठ नागरिकांना ३ वर्षांच्या एफडीवर ७% व्याजदर दिला जातोय. (FD Rates For Senior Citizens) त्यामुळे ज्येष्ठांनी या बँकेत ३ वर्षांसाठी १ लाख रुपये गुंतवलेले असतील तर त्याचे १.२३ लाख रुपये होतील.
इंडियन बँक
इंडियन बँक ज्येष्ठ नागरिकांना ३ वर्षांच्या एफडीवर ६.७५% इतका व्याजदर देते. त्यानुसार, ज्येष्ठांनी ३ वर्षांसाठी गुंतवलेले १ लाख रुपये १.२२ लाख रुपये होतात.