FD Rates | अनेक लोक भविष्यासाठी गुंतवणूक करून ठेवत असतात. परंतु ही गुंतवणूक करताना त्यातून चांगला परतावा मिळावा आणि आपले पैसे सुरक्षित असावे असे सगळ्यांनाच वाटते. यासाठी बाजारात अनेक पर्याय देखील उपलब्ध आहे. अनेक लोक हे एफडीमध्ये गुंतवणूक करतात. कारण मुदत ठेव हा एक चांगला पर्याय आहे. यातून चांगला परतावा देखील मिळतो. अशातच आता या मे महिन्यामध्ये अनेक बँकांनी त्यांच्या एफडीवरील व्याजदर वाढवलेला आहे. त्यामुळे तुम्ही बँकेत एफडी केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. आता आपण या बँक काही बँकांची माहिती पाहणार आहोत. ज्यांच्याकडे एफडीवर (FD Rates) चांगला व्याजदर मिळेल
उत्कर्ष स्मॉल बँक | FD Rates
या बँकेने दोन कोटी रुपयांपर्यंतच्या एफडी करणाऱ्यांसाठी व्याजदरात बदल केलेला आहे. या बँकेकडून एफडीवर आता 4 टक्केपासून ते 8.5% पर्यंत व्याज मिळत आहे. त्यामुळे तुम्हाला या बँकेतून चांगला परतावा मिळेल.
आरबीएल बँक
या आरबीएल बँकेने देखील त्यांच्या एफडीवरील व्याज दरात मोठ्या बदल केलेला आहे. हा केलेला बदल दोन कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवर लागू आहेत. नवीन बदलानुसार आता 18 ते 24 महिन्यांसाठीच्या एफडीवर आरबीएल बँकेकडून 8 टक्क्यांनी व्याज मिळणार आहे.
कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक
कॅपिटल स्मॉल फायनान्स बँकेने देखील त्यांच्या एफडीवरील व्याजदरात बदल केलेला आहे. हा व्याजदर देखील दोन कोटी रुपयांपर्यंतच लागू होतो. एफडीवर 3.5% पासून ते 7.55% पर्यंत दिला जाईल. या बँकेकडून 400 दिवसांसाठीचा एफडीवर सर्वाधिक व्याज दिले जाते.
सिटी युनियन बँक
सिटी युनियन बँकेने देखील त्यांच्या व्याजदरात बदल केलेला आहे. या बदललेल्या व्याजदरानुसार दोन कोटी रुपयांपर्यंत एफडी लागू असेल. या बँकेकडून ग्राहकांना 5 ते 7.25 टक्के दराने व्याज दिले जाते. 400 दिवसांच्या एफडीसाठी ही बँक 7.25 टक्के व्याज देते.