FD Rates : ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘ही’ बँक देतेय 8% व्याजदर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या बंधन बँकेने 2 कोटींपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. त्यानुसार बँक 600 दिवसांच्या (1 वर्ष, 7 महिने, 22 दिवस) ठेव कालावधीसाठी सर्वसामान्यांसाठी 7.50% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 8% व्याजदर देत आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार नवे व्याजदर 5 जानेवारी 2023 पासून लागू होतील.

बंधन बँक 7 दिवस ते 30 दिवसाच्या ठेवींवर, बँक 3.00% व्याज दर देत आहे आणि 31 दिवस ते 2 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत होणाऱ्या ठेवींवर 3.50% व्याजदर देईल. बंधन बँक 2 महिने ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवर 4.50% व्याजदर ऑफर करणार आहे आणिआता 1 वर्ष ते 599 दिवसांच्या ठेवींवर 7.25% व्याजदर देणार आहे.

याशिवाय, 600 दिवसांच्या (1 वर्ष, 7 महिने, 22 दिवस) मॅच्युरिटी ठेवींवर आता 7.50% व्याजदर मिळेल तसेच जेष्ठ नागरिकांसाठी याच कालावधीसाठी व्याजदर हा 8% असेल. मात्र अनिवासी भारतीय ज्येष्ठ नागरिक या व्याजदरासाठी पात्र नाहीत तर फक्त रहिवासी भारतीय पात्र आहेत. याशिवाय बंधन बँक 601 दिवस ते 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवर आता 7.25% व्याजदर मिळेल. तसेच 5 वर्षे ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वर बंधन बँक 5.85% व्याजदर देईल.