FD Rates : ‘या’ बँका FD वर देत आहेत जास्त रिटर्न, व्याज दर तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : गुंतवणुकीच्या प्रकारांमध्ये फिक्स्ड डिपॉझिट्स हा सर्वांत लोकप्रिय प्रकार आहेत. आजही अनेक लोकांकडून फिक्स्ड डिपॉझिट्सलाच पहिली पसंती मिळते आहे. गॅरेंटेड रिटर्न आणि पैसे गमावण्याचा धोका नसल्यामुळे मोठ्या संख्येने लोकं एफडी निवडतात. मात्र हे लक्षात घ्या कि, बँकांमध्ये FD असलेल्या गुंतवणूकदारांसाठी 2022 हे वर्ष खूप चांगले ठरले आहे. कारण मे 2022 पासून बँकांकडून FD वरील व्याजदरात सातत्याने वाढ केली जाते आहे.

Types of fixed deposit: How to Choose the Right FD | IDFC FIRST Bank

जवळपास सर्वच बँकांकडून फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात (FD Rates) वाढ करण्यात आली आहे. त्याच वेळी, अशाही काही बँका आहेत ज्यांनी फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात एकदा नव्हे तर दोन वेळा वाढ केली ​​आहे. जर आपणही एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर एचडीएफसी बँक आणि पंजाब नॅशनल बँकेकडून दिल्या जाणाऱ्या व्याजदरांबाबत जाणून घ्या…

PNB Q1 results: Net profit slumps 70% YoY to Rs 308 cr - BusinessToday

PNB चे व्याजदर

PNB कडून 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर 3.50% ते 6.10% पर्यंतचा व्याजदर दिला जात आहे. तसेच ही बँक आता सर्वसामान्यांना 7%, ज्येष्ठ नागरिकांना 7.50% आणि अति-ज्येष्ठ नागरिकांना 7.80% व्याजदर देत आहे. तसेच PNB कडून 80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना FD अतिरिक्त 80 बेसिस पॉइंट्सची ऑफर देत आहे. इथे हे लक्षात घ्या कि, हा अतिरिक्त व्याजदर 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या सर्व मुदतीवर उपलब्ध आहे. FD Rates

नवीन व्याज दर (FD Rates)

46 ते 90 दिवसांच्या FD वर 4.50% व्याजदर
180 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर 5.50% व्याजदर
1 वर्षांच्या FD वर 6.30% व्याजदर
600 दिवसांच्या FD वर 7% व्याजदर, सुपर ज्येष्ठ नागरिकांना 7.80% व्याजदर
601 दिवस ते 2 वर्षांच्या FD वर आता 6.30% व्याजदर
2 ते 3 वर्षाच्या FD वर 6.25% व्याजदर
3 ते 5 वर्षांच्या FD वर 6.10% व्याजदर
5 ते 10 वर्षांच्या FD वर 6.10% व्याजदर

The 20% growth principle that built HDFC Bank | Mint

HDFC बँकेचे FD वरील नवीन दर

HDFC बँकेकडून या महिन्यात दुसऱ्यांदा FD वरील व्याजदरात वाढ केली गेली आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, 26 ऑक्टोबर 2022 पासून नवीन व्याजदर लागू केले जाणार आहेत. तसेच आता ज्येष्ठ नागरिकांना सामान्य ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या व्याजदरापेक्षा 50 बेसिस पॉईंट्सचा अतिरिक्त व्याजदर मिळेल. या दर वाढीनंतर, आता ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीच्या FD वर 3.5% ते 6.95% पर्यंतचा व्याजदर मिळेल. FD Rates

26 ऑक्टोबरपासूनचे नवीन व्याज दर असे असतील (FD Rates)

7 – 14 दिवस – 3.00%
15 – 29 दिवस – 3.00%
30 – 45 दिवस – 3.50%
46 – 60 दिवस – 4.00%
61-89 दिवस – 4.50%
90 दिवस ते 6 महिने – 4.50%
6 महिने 1 दिवस ते 9 महिने – 5.25%
9 महिने 1 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी – 5.50%
1 वर्ष ते 15 महिने – 6.10%
15 महिने ते 18 महिने – 6.15%
18 महिने ते 21 महिने – 6.15%
21 महिने ते 2 वर्षे – 6.15%
2 वर्षे 1 दिवस – 3 वर्षे – 6.25%
3 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षे – 6.25%
5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे – 6.20%

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.hdfcbank.com/personal/resources/rates

हे पण वाचा :
Interest Rates : ‘या’ चार बँका बचत खात्यावर देत आहेत सर्वाधिक व्याज, नवीन दर तपासा
PNB ने FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीन व्याज दर तपासा
नवीन बदल अन् फीचर्स सहित पुन्हा लाँच होणार Yamaha RX 100, कंपनीने दिले सूतोवाच
‘या’ Multibagger Stock ने गेल्या 4 वर्षांत गुंतवणूकदारांना दिला कोट्यवधी रुपयांचा नफा !!!
Train Cancelled : दिवाळीनंतरही रेल्वेकडून 116 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा