हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (FD Rules) गेल्या काही काळात पैसा कमावण्याइतकाच तो योग्य ठिकाणी गुंतवणेदेखील महत्वाचे आहे, हे अनेकांना पटलंय. त्यामुळे बरेच लोक आवर्जून गुंतवणूक करतात. यासाठी आपण कायम सुरक्षित आणि निश्चित परतावा देणाऱ्या योजनेच्या शोधात असतो. त्यामुळे बरेच लोक मुदत ठेवींमध्ये पैसे गुंतवतात. मुदत ठेव म्हणजे काय तर एफडी. गेल्या कित्येक वर्षांपासून अनेक गुंतवणूकदार डोळे बंद करून FD मध्ये गुंतवणुक करत आहेत. अनेकांना त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये FD समाविष्ट करायला आवडते.
तुम्हालाही FD करायची आहे का? तर बिन्दास्त करा. पण त्याआधी काही महत्वाच्या गोष्टी समजून घ्या. कारण कोणताही विचार न करता FD मध्ये गुंतवणूक करणे नुकसानदायी ठरू शकते. (FD Rules) तुम्हाला तुमचे नुकसान करून घ्यायचे नसेल तर ही बातमी स्किप करू नका. कारण आज आम्ही तुम्हाला FD मध्ये गुंतवणूक करताना कोणत्या बाबी लक्षात घ्यायच्या त्याबाबत सविस्तर माहिती देणार आहोत. म्हणजे काय होईल? तुमच्या डिक्शनरीतून नुकसान हा शब्द वगळता येईल. चला जाणून घेऊया.
FD करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा (FD Rules)
1. जर तुम्ही अधिक नफ्याच्या हेतून गुंतवणूक करत असाल तर सरकारी बँकेसोबत तुम्ही खाजगी क्षेत्रातील किंवा लघु वित्त बँकांमध्ये देखील FD करू शकता. यामुळे तुम्हाला चांगल्या व्याजदराचा लाभ मिळतो.
2. जर तुम्ही FD मध्ये मोठी रक्कम गुंतवत असाल तर थांबा. कधीच मोठी रक्कम एकाच एफडीमध्ये गुंतवू नये. याउलट वेगवेगळ्या कालावधीसाठी FD तयार करा. समजा, तुमच्याकडे एकूण ५ लाख रुपये आहेत. (FD Rules) तर त्याची एकच FD करण्याऐवजी तुम्ही वेगवेगळ्या कालावधीसाठी ५ वेगवेगळ्या FD बनवू शकता. यातील प्रत्येक FD मध्ये तुम्ही प्रत्येकी १ लाख रुपये गुंतवू शकता. असे केल्याने तुम्हाला व्याजदरांचा अधिक चांगल्या पद्धतीने लाभ घेता येईल.
3. FD करताना तिच्या कालावधीची पूर्ण माहिती घ्या. कारण, जर तुम्ही दीर्घ मुदतीची FD करत असाल आणि आपत्कालीन समयी तुम्हाला पैशांची गरज भासली तर FD मधूनच मोडावी लागेल. (FD Rules) ज्यासाठी तुम्हाला दंड बसू शकतो. हा दंड भरायला लागू नये म्हणून आधीच एफडीचा कालावधी तपासून घ्या.
4. आयकर स्लॅब लक्षात घेता तुमच्या एफडी उत्पन्नावर कर आकारला जातो. त्यामुळे एका आर्थिक वर्षात FD वर मिळणारे व्याज हे १० हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास व्याजावर TDS कापला जातो. जो एकूण व्याजाच्या 10 टक्के असतो. यासाठी ज्येष्ठांना ५० हजार रुपये इतकी मर्यादा आहे. (FD Rules) लक्षात घ्या, जर तुमचे उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा कमी असेल तर तुम्ही FD मध्ये गुंतवणूक केल्यास TDS कपात टाळू शकता. यासाठी तुम्हाला फॉर्म 15G आणि फॉर्म 15H भरून बँकेत सबमिट करावा लागेल.
5. ज्येष्ठांना एफडीवर ५०% जादा व्याज दिले जाते. तर काही विशेष एफडीवर बँकांकडून १% जास्त व्याज मिळते. त्यामुळे, नफ्याचा विचार करत असाल तर तुम्ही घरातील ज्येष्ठांच्या नावाने एफडी काढू शकता. (FD Rules) यावर तुम्हाला अधिक व्याजाचा लाभ मिळेल.