नवरात्र उपवासामुळे थकवा जाणवतोय? तर करा हे उपाय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात 15 ऑक्टोंबरपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. सोबत महिलांचे नवरात्रीचे उपवास देखील सुरू झाले आहेत. याकाळात अनेक महिला सहनशक्ती नसताना देखील नवरात्रीचे उपवास धरतात. यामुळे त्यांना अशक्तपणा / थकवा जाणवण्यास सुरुवात होते. असा त्रास होणाऱ्या महिलांनी सतत आहारात सुकामेवा, थंड पेय, नारळाचे पाणी घ्यावे. तसेच काही घरगुती उपाय देखील करावेत, ज्यामुळे त्यांना उपवासादरम्यान अशक्तपणा जाणवणार नाही.

थकवा जाणवल्यास करा हे उपाय

1) थंड पेय प्यावे – अनेक महिलांना नवरात्रीचे उपवास करताना चक्कर, थकवा येण्याचे त्रास जाणवतात. त्यामुळे अशा महिलांनी आहारात नेहमी थंड पेय द्यावे. ताक, सरबत, शहाळे अशा गोष्टी पिल्यानंतर सहज थकवा दूर होऊन जाईल. तसेच, शरीराला ऊर्जा शक्ती मिळेल.

2) कामाची दगदग कमी करा – नवरात्रीच्या काळात महिलांवर कामाची जबाबदारी जास्त असते. याकाळात उपवास असताना देखील सतत त्यांची धावपळ देखील होत असते. त्यामुळे उपवास धरलेल्या महिलांनी दिवसातून दोन तास तरी आराम करावा. आपल्या मेंदूला आणि शरीराला शांत ठेवावे. यामुळे थकवा ही कमी होईल आणि आराम ही मिळेल.

3) ड्रायफ्रुट्स खात रहावा – नवरात्र उत्सवात अनेक महिला उपवास धरत असल्या तरी त्यांना वेळेमध्ये फराळ करण्याची देखील सवड मिळत नाही. त्यामुळे अशा महिलांनी नेहमी आपल्याजवळ ड्रायफ्रुट्स ठेवावे. ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने लवकर भूक लागत नाही. तसेच, शरीराला प्रोटीन देखील मिळते. त्यामुळे वेळ मिळेल, तसे ड्रायफ्रुट्स खात राहावे.

4) व्यायाम करावा – नवरात्र उत्सवात जास्त काम केल्यामुळे आणि उपवास असल्यामुळे महिलांचे शरीर लवकर थकून जाते. त्यामुळे हा थकवा दूर करण्यासाठी महिलांनी सकाळी उठल्यानंतर अर्धा तास तरी व्यायाम करावा. सकाळच्या वेळी व्यायाम केल्यानंतर दिवसभर ताजे टवटवीत वाटेल आणि शरीर ही तंदुरुस्त राहील.

5) शाबुदाना, रताळे खावा – उपवासादरम्यान आहारामध्ये साबुदाणा किंवा रताळे खाल्ल्यानंतर भूक लवकर लागणार नाही. तसेच पोटात अन्न नसल्यामुळे जो थकवा जाणवतो तो देखील जाणून येणार नाहीत. सहसा रताळे हे दुधासोबत खावा ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळेल. ज्यामुळे थकवा दूर होईल.