Fertilizer Rate | शेतकऱ्यांच्या खिशाला बसणार कात्री, खतांच्या किमतीत झाली लक्षणीय वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Fertilizer Rate | शेती करताना शेतकऱ्यांना सगळ्याच गोष्टींची काळजी घ्यावी लागते. बियाणे कोणते पेरावे? त्याचप्रमाणे कोणत्या खतांचा वापर करावा? या सगळ्या गोष्टींची काळजी शेतकऱ्यांना घ्यावी लागते. अशातच आता शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. कारण रासायनिक खतांच्या किमतीत आता मोठ्या प्रमाणात भाव वाढ झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून आलेले आहे.

कृषी केंद्र संचालक किंवा डीलर यांच्याकडे खतांचा साठा पुरेसा आहे. त्यामुळे आगामी खरीप हंगामासाठी रासायनिक खतांच्या (Fertilizer Rate) भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. शेती करताना रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. शेतीच्या पिकाचा रोगराईपासून तसेच कीटकांपासून बचाव करण्यासाठी रासायनिक खत गरजेचे असते. परंतु आता रासायनिक खतांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.

खरीप हंगामाची पेरणी जून महिन्यात होत असली. तरी मे महिन्यापासूनच खतांची खरेदी चालू झालेली आहे. त्याशिवाय बेसल डोस देणे सुद्धा आवश्यक असल्याने खतांची मागणी ही वाढलेली आहे. परंतु आता रासायनिक खतांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. मिश्र खते, सुपर पोटॅशच्या भावात ही वाढ झालेली आहे. त्यामुळे डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टरच्या आधारे होणाऱ्या अंतर मशागतीच्या खर्चातही मोठा मोठी वाढ झालेली आहे.

ट्रॅक्टरने होणाऱ्या नांगरणीच्या खर्चात प्रति एकर 300 रुपयांपर्यंत वाढ झालेली आहे. खोल नांगरणीचा खर्च हा 2 हजार रुपये प्रति एकरावर गेलेला आहे. त्यात आता खतांच्या किमती देखील वाढल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे.

खतांच्या किमतीत होणार दीडपटीने वाढ | Fertilizer Rate

गेल्या दोन वर्षांपूर्वीच खतांच्या किमतीमध्येच सुमारे दीड पटीने वाढ करण्यात आलेली आहे. आता आणखी 250 रुपयांपर्यंत खतांच्या किमतीत वाढ झालेली आहे. परंतु शेतकऱ्यांच्या पिकविलेल्या शेतमालाच्या किमती सातत्याने घसरत आहे. त्यामुळे आता खरीप हंगामाच्या तोंडावर खतांच्या किमतीत वाढ झालेली आहे.