Diwali Home Loan Offer : दिवाळीत खरेदी करा स्वत:चं घर; ‘या’ बँकेची खास स्किम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आरबीआयच्या रेपो दरात वाढ करण्याच्या निर्णयानंतर गृहकर्जावरील (Home Loan) व्याजदर महाग झाले आहेत. पण सणासुदीच्या काळात गृह ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँका आणि गृहनिर्माण संस्था स्वस्तात गृहकर्ज (Home Loan) देत आहेत. SBI ते HDFC, बँक ऑफ महाराष्ट्र आणि बजाज फायनान्स या देशातील सर्वात मोठ्या बँकांनी सणासुदीच्या काळात गृहकर्जाचे व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

SBI स्वस्त गृहकर्ज
सण आणि दिवाळी ऑफर अंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडिया स्वस्तात गृहकर्ज (Home Loan) देत आहे. बँकेने गृहकर्जाच्या व्याजदरात 0.25 टक्क्यांनी कपात केली असून, त्यानंतर व्याज 8.40 टक्क्यांपासून सुरू होत आहे. SBI टॉप अप कर्जावर 0.15 टक्के आणि मालमत्तेवरील कर्जावर 0.30 टक्के सूट देत आहे. तसेच बँकेने जानेवारी 2023 पर्यंत प्रक्रिया शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

HDFC कडून स्वस्त गृहकर्ज ऑफर
HDFCने देखील स्वस्त गृहकर्जाच्या (Home Loan) ऑफर आणल्या आहेत. HDFC 750 पेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर असलेल्यांना 8.40 टक्के दराने गृहकर्ज देत आहे, गृहकर्जाची रक्कम विचारात न घेता. ही ऑफर 30 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. यापूर्वी,HDFC क्रेडिट स्कोअरवर अवलंबून 8.60 ते 9 टक्के पर्यंत गृहकर्ज देत होती.

बजाज फायनान्सने देखील दिली ऑफर
बजाज हाउसिंग फायनान्सने दिवाळी स्पेशल ऑफर आणली आहे ज्यामध्ये 8.2 टक्के दराने गृहकर्ज दिले जात आहे. ही ऑफर पगारदार आणि व्यावसायिक लोकांसाठी आहे. स्वस्त गृहकर्ज (Home Loan) ऑफर 14 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान चालू आहे. तसेच हि ऑफर काही निवडक लोकांसाठी असणार आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रनेसुद्धा दिली गृहकर्जावर ऑफर
बँक ऑफ महाराष्ट्रनेही सणासुदीच्या दिवशी गृहकर्जाच्या (Home Loan) व्याजदरात 30 ते 70 बेसिस पॉईंटची कपात केली असून बँकेचे गृहकर्ज 8 टक्क्यांपासून सुरू होत आहे.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय