व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

बुलढाण्यात शिवसेना- शिंदे गटात तुफान राडा; पोलिसांचा लाठीचार्ज

 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बुलढाणा जिल्ह्यात शिवसेना आणि शिंदे गटात मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळालं. बुलढाण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत ठाकरे गटाच्या कार्यक्रमावर काही तरुणांनी अचानक हल्ला केला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यावेळी मोठा तणाव निर्माण झाला.

बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात आज ठाकरे गटाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम आजोजित करण्यात आला होता. यावेळी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी सत्कार समारंभात घुसून काही पदाधिकाऱ्यांना मारहाण केली. यात शिवसेना संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख यांच्यासह उपनेते लक्ष्मण वडले यांनाही मारहाण करण्यात आली असल्याचा दावा करण्यात येत आहे.

आम्हीच शिवसेनेचे लोक आहोत, असा दावा करत गायकवाड यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी तातडीनं हस्तक्षेप केला. शब्दाला शब्द वाढत गेल्यानंतर अखेर पोलिस दलाच्या वतीने जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाने बुलढाण्यात तणाव निर्माण झाला