रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून एकावर हल्ला; कराडातील प्रकाराने खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड येथील चांभार गल्ली गुरूवारपेठ येथे एका युवकावर चाकू हल्ला झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. हल्ल्यात यश ऊर्फ निखील गणेश कारंडे (वय १८ रा. गुरूवारपेठ कराड) हा जखमी झाला असून याप्रकरणी हद्दपार असलेल्या रोहित रमेश कारंडे (वय २४ रा. चांभार गल्ली, कराड) याच्यासह त्याचा साथीदार अतीष लादे (रा. लादे गल्ली, बुधवारपेठ, कराड) अशा दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे गुरूवार पेठ परिसरात खळबळ उडाली आहे.

बुधवारी रात्री दहाच्या सुमारास यश कारंडे आणि सोमनाथ कारंडे हे उभा असताना रोहित कारंडे व अतीष लादे आले. त्यांनी यशला मारहाण करण्यास सुरूवात केली. सोमनाथ भांडणे सोडवायला आला मात्र अतीष याने त्याला मारहाण केली. रोहितने यशला मारहाण करत तुला जिवंत ठेवणार नाही. मी तडीपार असल्याची पोलिसांना माहिती देतोस काय? असे म्हणत चाकूने भोसकण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विजय गोडसे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रोहित कारंडे याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे.

Leave a Comment