उर्फी जावेद या माॅडेलवर गुन्हा दाखल करा : पोलिसांना निवेदन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | सोशल मिडियावरील उर्फी जावेद या माॅडेलवर गुन्हा दाखल करावा, यासाठी सातारा पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे. सातारा येथील महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका प्रतिभा शेलार यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल यांना निवेदन दिले आहे. मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, महायुक्त कमिशनर आयडीआयजीएसपी यांच्यासह संबधित ठिकाणी निवेदन मेलद्वारे पाठवलेले आहे, तरीही अजून गुन्हा दाखल झालेला नाही.

निवेदनात म्हटले आहे की, सोशल मीडियावर मॉडेल तारका उर्फी जावेद या आक्षेपार्द अगदी तोकडे कपडे घालून विचित्र प्रकारे देह प्रदर्शन करीत आहे. सामाजिक भान ठेवता अंग प्रदर्शन करीत असल्याने लहान मुलांवर व युवापिढीवर होत आहे. परिणाम व अत्याचार याबाबत गुन्हा नोंद करण्याबाबत दिले निवेदन देण्यात आले. सध्या सोशल मीडियावर उर्फी जावेद या महिलेने भारतीय संस्कृतीचे उल्लंघन करून उघड- उघड देह प्रदर्शन करीत आहे.

Urfi Javed Statement

उर्फी जावेद हिने स्वातंत्र्याच्या नावाखाली देह प्रदर्शन करून उच्छाद मांडला आहे. सदरील महिला दैनंदिन रोज सोशल मीडियावर अंग प्रदर्शन करून व्हिडिओ अपलोड करत आहे. प्रदर्शनामुळे सामाजिक भान हरपले आहे. लहान मुलांवर त्यांचा प्रचंड परिणाम होत आहे. अंगाचे अश्लील चाळे करणे, देहप्रदर्शन करणे, कमी कपडे घालून देह दाखवणे. तसेच सोशल मीडियावर संपूर्ण महिला वर्गास मान खाली घालायला लागत आहे. सदरहीन महिला यास याबाबत जाब विचारून मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करणे गरजेचे आहे.

उर्फी जावेद एक सोशल मीडियावर असणारी मॉडेल हीच्यावर अश्लील फोटो व व्हिडिओज तयार करून सोशल मीडियावर अपलोड, सेंड करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करावा, असेही निवेदनात म्हटले आहे.