लालू यादव यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येणार; कधी रिलीज होणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे राइट्स यादव कुटुंबाने घेतले आहेत. गेल्या 5 महिन्यापासून या चित्रपटाच्या निर्मितीला सुरुवात करण्यात आली आहे. या चित्रपटांमध्ये तेजस्वी प्रसाद गुंतवणूक करणार आहेत. याबाबतची माहिती राष्ट्रीय जनता पक्षाकडून देण्यात आली आहे. मात्र अद्याप या चित्रपटांमध्ये लालू प्रसाद यांची प्रमुख भूमिका कोण साकारेल? तसेच त्यांचा हा बायोपिक कधी रिलीज होईल याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रीय जनता पक्षाने लालू प्रसाद यादव यांच्या जीवनावर आधारित एक बायोपिक येणार असल्याची माहिती दिली आहे. या बायोपिकचे राईट्स यादव कुटुंबाने घेतले आहेत. तर या बायोपिक मध्ये तेजस्वी प्रसाद गुंतवणूक करणार आहेत. मुख्य म्हणजे, या चित्रपटाची निर्मिती प्रकाश झा यांच्या प्रोडक्शन हाऊसद्वारे करण्यात येणार आहे. अद्याप या चित्रपटांमध्ये कोणता अभिनेता काम करेल तसेच हा चित्रपट कधी प्रदर्शित केला जाईल याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

लालटेन असेल चित्रपटाचे नाव

असे म्हटले जात आहे की, लालूप्रसाद यादव यांच्या या चित्रपटांमध्ये हिंदी चित्रपट सृष्टीतील काही कलाकार काम करणार आहेत. हा चित्रपट पुढच्या वर्षी रिलीज करण्यात येईल. तसेच या चित्रपटाचे नाव लालटेन असे असेल. कारण की हे त्यांच्या राजकीय पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे. दरम्यान, आज म्हणजेच 27 ऑक्टोबर रोजी नितीन गडकरी यांच्या जीवनावर आधारित गडकरी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटामध्ये गडकरी यांची भूमिका राहुल चोपडा यांनी साकारली आहे. सध्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद दिला जात आहे.