उजनीचे पाणी वळवण्याचा निर्णय अखेर रद्द, आंदोलन स्थगित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सोलापूरचे मुख्य जलस्रोत असलेल्या उजनी धरणातून ५ टीएमसी पाणी इंदापूरला, बारामतीला वळवण्याचा निर्णय अखेर रद्द करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून सोलापूरकरांनी पाणी वळवण्याच्या निर्णयवरून आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले होते. या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. आज उपसचिव यांनी 22 एप्रिल 2021 रोजी काढलेला आदेश रद्द केल्याचे पत्र काढले आहे.

 

जयंत पाटील यांनी 18 मे रोजी उजनी धरणातून सोलापूरच्या हक्काचे पाणी इंदापूरला देणार नाही. तसा यापूर्वी काढलेला सर्वेक्षण आदेश रद्द करण्याचे तोंडी सांगितले होते. परंतु, जोपर्यंत लेखी आदेश मिळत नाही.तोपर्यंत आंदोलनाचा पावित्रा घेतला होता. अखेर हा निर्णय घेण्यात आल्यामुळे सोलापूरकरांना दिलासा मिळला आहे. उजनीच्या पाण्यासाठी केलेल्या आंदोलनाची धग राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘गोविंदबाग’ या निवस्थानापर्यन्त पोहचली होती. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता गोविंदबाग च्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.

आंदोलन स्थगित

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील उजनी पाणी प्रश्न घेऊन शेतकरी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या दारात बसले होते. उजनी धरणातून बारामती आणि इंदापूर जिल्ह्याला पाणी देण्यास विरोध करत उजनी बचाव संघर्ष समितीचे कार्यकर्ते इस्लामपूर याठिकाणी मंत्री जयंत पाटील यांच्या कारखान्यासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार होते.यावेळी पोलिसांनी कारखान्यावर थांबवून ठेवले. पोलिसांनी मज्जाव केल्याने यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. तर याची दखल घेत पाटील यांनी त्वरित हा आदेश रद्द करण्यात आला आहे असं स्पष्ट केलं. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.सोलापूर मध्ये काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे, शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनी देखील या निर्णयाला विरोध केला होता.

Leave a Comment