मराठा आरक्षणासंदर्भात मोठी अपडेट समोर! अखेर शिंदे समितीकडून कुणबी अहवालाचे काम पुर्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणासंदर्भात नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारा कुणबी अहवाल आता पूर्ण झाला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटल्यापासून शिंदे समिती या अहवालावर काम करत होती अखेर आज तो अहवाल पूर्ण करण्यात आला आहे. त्यामुळे आता सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे.

नुकतेच शिंदे समितीने कुणबी अहवालाचे पूर्ण काम करून तो अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. या अहवालाची तपासणी केल्यानंतर एकनाथ शिंदे कुणबी प्रमाणपत्र वाटपाबाबत मोठा निर्णय घेणार असल्याचे म्हटले जात आहे. मुख्य म्हणजे, आता एकनाथ शिंदे हा अहवाल सभागृहात मांडणार आहे. त्यामुळे या अहवालामधून आतापर्यंत किती कुणबी नोंदी मिळाल्या आहे? तसेच मराठा आरक्षणासाठी कोणते पुरावे आहेत या सर्व बाबत माहिती समोर येणार आहे .

दरम्यान, मराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करावे द्यावे अशी मागणी केली होती. या मागणीनंतर शिंदे समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने पहिला अहवाल 30 ऑक्टोबर रोजी सादर केला होता. त्यानंतर आज दुसरा अहवाल देखील सादर करण्यात आला आहे. आता हा अहवाल सादर झाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.