औरंगाबाद | औरंगाबादेतील क्रांतीचौक येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याची उंची वाढवण्याचे काम चार वर्षांपासून सुरु आहे. परंतु अजूनही या चौथऱ्याची उंची वाढवण्याचे काम पूर्ण झालेले नाही.
1962 मध्ये शिवसैनिकांकडून क्रांतीचौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. शहरात एकात्मिक रस्ते विकास योजना राबवण्यात आली. यावेळी क्रांतीचौकात उड्डाणपूल उभारण्यात आला. आणि पुलाची उंची जास्त, पण पुतळ्याची उंची कमी झाल्याने शिवसैनिकांनी पुतळ्याची उंची वाढवण्याची मागणी केली. यानंतर कालांतराने या पुतळ्याची उंची वाढवण्यासाठी कंत्राटदार निश्चित करून कामाला सुरुवात करण्यात आली. परंतु त्या कंत्राटदाराला पैसे न मिळाल्याने तो सुद्धा पळून गेला. त्याला गुन्हा नोंदवण्याची भीती दाखवून परत कामावर बोलावण्यात आले. पण आता हे काम कासवगतीने सुरु आहे.
आता हे काम डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु चौथऱ्याचे काम पूर्ण होऊनही छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कधी बसवन्यात येईल हे सांगता येणार नाही. या चौथऱ्यावर आकर्षक स्टोन बसवण्यात येणार आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बनवण्याचे काम पुण्यात सूरु आहे.