Union Budget 2023 : पर्यटनसाठी खास तरतूद; स्वदेश दर्शन योजनेसह युनिटी मॉल बद्दल अर्थमंत्र्यांचे मोठे निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 2023-24 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात आरोग्य, कृषी आणि पायाभूत सुविधांसह पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी महत्वाच्या योजनांची घोषणा करण्यात आली. पर्यटनाला चालना देण्यासाठी मोदी सरकारने 50 स्थळांची निवड केली असून या निवडक ठिकाणांना सरकारी मदत दिली जाणार आहे. याशिवाय स्वदेश दर्शन योजना आणि देखो अपना भारत योजना सुरु केल्या जाणार असल्याचे अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले.

आज पाहिले तर पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या खूप मोठ्या संधी आहेत. या क्षेत्रात विशेषतः तरुणांसाठी नोकऱ्या आणि उद्योजकतेच्या मोठ्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारकडून यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली आहे. आज पार पडलेल्या अर्थसंकल्पात पर्यटनसातही करण्यात आलेल्या तरतुदीत सीमा आणि ग्राम पर्यटनासाठी स्वदेश दर्शन योजना उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

Budget 2023 Live : अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्मला सीतारामन यांनी केल्या मोठ्या घोषणा | Loksabha Live

 

पर्यटन क्षेत्राबाबत अर्थमंत्र्यांची घोषणा

1) भारतातील 50 पर्यटन पर्यटन स्थळांचा विकास करण्यात येणार आहे.

2) पर्यटन स्थळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी संपूर्ण पॅकेज म्हणून विकसित केले जाणार

3) स्वदेश दर्शन योजनेंतर्गत पर्यटनाला चालना देणार

4) राज्यांच्या राजधानीत युनिटी मॉल सुरू करणार

5) युनिटी मॉल्स अंतर्गत एक जिल्हा, एक उत्पादन आणि हस्तकला उत्पादनांना प्रोत्साहन

स्वदेश दर्शन

स्वदेश दर्शन योजना काय आहे?

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या स्वदेश दर्शन अंतर्गत पर्यटन विकासासाठी कोट्यवधींचे प्रकल्प आणले जाणार आहेत. या योजनेद्वारे भारतातील सर्व तीर्थक्षेत्रांवर वाहतूक, आर्थिक स्थिती, रोजगार आणि अन्न यासारख्या अत्यावश्यक गोष्टींवर लक्ष दिले जाईल. स्वदेश दर्शन योजनेंतर्गत पर्यटन क्षमता असलेल्या ठिकाणांचा नियोजनबद्ध पद्धतीने आणि प्राधान्याने विकास करण्यात येणार आहे.

स्वदेश दर्शन

स्वदेश दर्शन योजनेची वैशिष्ट्ये

या योजनेत गंगेच्या काठावर वसलेल्या सर्व पर्यटन स्थळांमध्ये आवश्यकतेनुसार छोटी गेस्ट हाऊस, छोटी झोपडी, उद्याने इत्यादी बांधण्यात येणार आहेत. योजनेंतर्गत निवडलेल्या शहरांतील पर्यटन स्थळांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे.

पर्यटन

‘या’ पर्यटन स्थळांचा प्रचार होणार

स्वदेश दर्शन योजनेत सध्या ओळखल्या गेलेल्या सर्किट्समध्ये बौद्ध तीर्थक्षेत्रे, 5 राज्यांतील 12 स्थळांवरील कृष्ण तीर्थक्षेत्रे, रामायण सर्किट म्हणजेच भगवान रामाशी संबंधित पर्यटन स्थळे, प्राचीन सुफी परंपरा राखणारी पर्यटन स्थळे, जैन तीर्थक्षेत्रे. साइट, आध्यात्मिक सर्किट यांचा समावेश आहे. सात राज्यांचा समावेश करून पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकास केला जाणार आहे. याशिवाय नॉर्थ ईस्ट सर्किट, इको सर्किट, ट्रायबल सर्किट, हेरिटेज सर्किट, वाइल्ड लाइफ सर्किट या संभाव्य पर्यटन स्थळांना चांगल्या सुविधा देऊन पर्यटनाला चालना देण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली आहे.