Union Budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सादर करणार अर्थसंकल्प

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या अर्थमंत्री (Union Budget 2023) निर्मला सीतारामन आज 1 फेब्रुवारीला थोड्याच वेळात केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असल्यामुळे या अर्थसंकल्पाला मोठं महत्त्व आहे. जनतेला खुश करण्यासाठी सरकारकडून नेमक्या कोणकोणत्या घोषणा करण्यात येणार याकडे देशवासीयांचे लक्ष लागलेले आहे.

आज सकाळी 9.30 अर्थमंत्री बजेटवर राष्ट्रपतींची मंजुरी घेण्यासाठी राष्ट्रपती भवनात जातील आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील. येथे राष्ट्रपती अर्थसंकल्पाला औपचारिक मंजुरी देतील. सकाळी 10 वाजता अर्थमंत्री संसदेत पोहोचतील. सकाळी 10.30 वाजता अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक होणार असून, त्यामध्ये अर्थसंकल्पावर मंत्रिमंडळाची अधिकृत मान्यता घेतली जाणार आहे.

सकाळी 11: 30 वाजता अर्थमंत्री संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. दुपारी 3 वाजता अर्थसंकल्प सादर केल्यानंतर, अर्थमंत्री पत्रकार परिषद घेणार आहेत. ज्यामध्ये त्या अर्थसंकल्पातील घोषणांवर बुलेट पॉइंट्स देतील आणि माध्यमांच्या प्रश्नांची उत्तरे देतील.

कोरोना महामारीनंतर आर्थिक दृष्ट्या पुन्हा एकदा देशाला प्रगतीपथावर आणण्यासाठी महत्वपूर्ण अंतर्दृष्टि प्रदान करण्याची अपेक्षा 2023 च्या अर्थसंकल्पात अपेक्षित आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पातून देशातील शेतकरी वर्गाला, छोट्या व्यापाऱ्यांना आणि नोकरदार वर्गाला सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत.