हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Financial Discipline Rules) जगायला अन्न, वस्त्र आणि निवारा गरजेचे आहेतच, पण त्यासोबत पैसा सुद्धा आजची मूलभूत गरज आहे. कारण, जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तू पैशांशिवाय विकत घेणे अशक्य आहे. त्यामुळे व्यक्तीला सुखकर आयुष्य जगण्यासही पैसा हा लागतोच. श्रीमंत व्हावे, गाड्यांमधून फिरावे, बंगल्यात रहावे आणि लॅव्हिश लाईफ जगावी असे कुणाला वाटत नाही? पण यासाठी पैसे कमावणे जितके महत्त्वाचे तितकी पैशाची बचत सुद्धा करणे महत्वाचे आहे. तुम्ही आज वाचवलेले पैसे तुम्हाला उद्या कामी येणार आहेत. कदाचित आज बचत केली तर उद्या श्रीमंत व्हायला वेळ लागणार नाही.
आता पैशाची बचत करायची म्हणजे नक्की काय करायचं? कमावलेले पैसे वाचवून श्रीमंत कसं व्हायचं? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील तर ते बरोबर आहेत. या संदर्भात आज आम्ही तुम्हाला आर्थिक शिस्तीचे काही नियम सांगणार आहोत. ज्याचे पालन केले असता तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कुणीच अडवू शकत नाही. जाणून घ्या खालीलप्रमाणे :-
1. ध्येय निश्चित करा (Financial Discipline Rules)
तुम्हाला भरपूर पैसे कमवायचे आहेत पण कशासाठी? ते तुम्हाला माहित असायला हवे. अर्थात तुमच्याकडे एक निश्चित ध्येय असायला हवे. जे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला किती पैसा लागणार आहे? याचा अंदाज येईल. त्यानुसार तुम्ही पैसे वाचवून तो पैसे कसा वाढवता येईल? यावर लक्ष केंद्रित करू शकता. एक निश्चित ध्येय असल्याने तुम्हाला पैसे का कमवायचे आहेत? आणि किती कालावधीत कमवायचे आहेत? याचे नियोजन करता येते. हे नियोजन केले असता तुम्ही ध्येयपूर्तीसाठी शक्य ते सगळे प्रयत्न करता. परिणामी श्रीमंतीकडे एक पाऊल पुढे टाकता असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
2. बजेट तयार करा आणि खर्चाची नोंद करा
सगळ्यात आधी तुम्ही जितके पैसे कमावता त्यातून होणारे आवश्यक खर्च तुम्हाला पक्के माहित असायला हवेत. त्यातून खर्च वगळून शिल्लक कसे वाचवता येतील याचे नियोजन हवे. म्हणून तुम्ही कुठे आणि किती पैशांचा खर्च करता? याचा व्यवस्थित हिशोब हवा. (Financial Discipline Rules) अगदी घरभाडे, वीज बिल, किराणा यासह बाहेर जेवायला जाणे, फिरायला जाणे या खर्चांचाही हिशोब मांडा. महिन्याची कमाई किती आहे आणि त्यातून किती खर्च अनावश्यक आहे ते लक्षात घेऊन टाळा. तरच पैशांची बचत होईल.
3. पैसे वाचवा आणि गुंतवा
महिन्याच्या कमाईतून एकदा का पैशांची बचत सुरु झाली की, हळूहळू तुम्हाला बचतीची सवय लागेल. यातून तुम्ही बरेच पैसे जमा कराल. पण पैसे वाचवून नुसते जमा करण्याला अर्थ नाही. कारण पैसा नुसता ठेवून बघत नाही. (Financial Discipline Rules) मग अशावेळी तुमच्याकडे असलेल्या पैशांची गुंतवणूक योग्य ठिकाणी करण्यासाठी विविध पर्यायांची माहिती करून घ्या. यात दीर्घ कालावधीसाठी पैशांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला जास्तीचा फायदा होण्याची शक्यता असते. त्यामुळे कमी वयात गुंतवणूक करता येईल याकडे फोकस ठेवा.
4. योग्य ठिकाणी गुंतवणूक करा
कुणीतरी पैसे गुंतव सांगितले म्हणून पैसे गुंतवू नका. आपले पैसे गुंतवताना सुरक्षा आणि निश्चित परताव्याची खात्री करून घ्या. म्हणजेच काय तर, पैसे गुंतवायचे असतील तर ते योग्य ठिकाणी गुंतवा. (Financial Discipline Rules) ज्यामुळे तुमचे नुकसान होणार नाही. त्यामुळे पूर्ण अभ्यास करून वा गुंतवणूक तज्ञांचा सल्ला घेऊन पैशांची गुंतवणूक करा. बँकांच्या मुदत ठेव योजना, गोल्ड बॉन्ड, शेअर्स कुठेही गुंतवणूक करताना जोखीम लक्षात घ्या. सर्व गोष्टींचा तुलनात्मक अभ्यास करा आणि मगच गुंतवणूक करा.
5. आपत्कालीन निधी तयार करा
आजकाल कोणती समस्या कधी आणि कशी येईल? याबाबत काहीही सांगू शकत नाही. त्यात मेडिकल इमर्जन्सी कधीही येऊ शकते. अशा आपत्कालीन परिस्थितीत कितीही पैशांची गरज भासू शकते. या अशा परिस्थितीशी सामना करता यावा म्हणून आपत्कालीन निधी अर्थात इमर्जन्सी फंड तयार करून ठेवा. ज्यातून तुम्हाला लगेच पैसा उभा करता येईल. (Financial Discipline Rules) मात्र, आपल्याकडे इमर्जन्सी फंड नसेल तर अशावेळी गुंतवणुकीतून पैसा काढावा लागतो. ज्यामुळे गुंतवणूक कमी होते आणि नसून होते.