अमेरिकेच्या डब्ल्यूएचओपासून वेगळे होण्याबाबत चीनने वक्तव्य म्हणाले, हे तर ‘पावर पॉलिटिक्‍स’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अलीकडेच अमेरिकेने डब्ल्यूएचओ बरोबरील आपले संबंध संपवले आहेत. यावर आता चीनने विधान केले आहे. ते म्हणाले आहेत की,’ जागतिक आरोग्य संघटनेपासून अमेरिकेचे वेगळे होणे हे ‘पॉवर पॉलिटिक्स’ आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की,’ आंतरराष्ट्रीय समुदाय हा अमेरिकेच्या या वृत्तीशी सहमत नाही आहे. अमेरिका डब्ल्यूएचओपासून वेगळी होत आहे तसेच सत्तेचे राजकारण करीत आहे.

‘एआरवाय न्यूज’च्या वृत्तानुसार प्रवक्त्याने म्हटले आहे की,’ चीनवर कोरोना व्हायरस पसरविण्याचा आरोप ठेवल्याने हा व्हायरस संपुष्टात येणार नाही किंवा लोकांचे जीवही वाचणार नाहीत. अशावेळी या महामारीवर राजकारण करण्याऐवजी अमेरिकन राजकारण्यांनी त्याला संपविण्यासाठी आवश्यक असलेल्या उपायांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. रविवारी व्हाईट हाऊसने दिलेल्या एका निवेदनात असे म्हटले होते की, ‘भ्रष्टाचार आणि चीनवरील अवलंबित्व संपवल्यास अमेरिका डब्ल्यूएचओमध्ये सामील होण्याचा विचार करू शकते.’

विशेष म्हणजे यापूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेपासून आपण वेगळे होत असल्याचे जाहीर केले होते. त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेबरोबर असलेले त्यांचे सर्व संबंध संपवले. यावर युरोपियन युनियननेही त्यांना पुन्हा एकदा विचार करण्यास सांगितले होते. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी एका निवेदनात म्हटले आहे की,’डब्ल्यूएचओला निधी देण्याऐवजी ते सार्वजनिक आरोग्य प्रकल्पांवर खर्च करतील. आता हा पैसा जगभरात योग्य हेतूसाठी वापरला जाईल आणि अमेरिकन नागरिक त्यांचे संरक्षण करत राहतील. यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेचा निधी कमी करण्याविषयीही सांगितले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment