नोकरदारांसाठी खुशखबर! PF खात्यासाठी सुरू झाली WhatsApp सेवा

नवी दिल्ली । देशातील नोकरदार वर्गासाठी एक महत्वाची बातमी मिळत आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेनं (EPFO) त्यांच्या ग्राहकांच्या तक्रारीनंतर तात्काळ बदल करत व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन सर्व्हिस (EPFO WhatsApp Helpline Service) सुरू केली आहे. केंद्रीय कामगार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ईपीएफओच्या दुसऱ्या संचार माध्यमांमध्ये वारंवार ग्राहकांकडून तक्रार येत असल्यामुळे त्यांच्या समाधानासाठी ही सुविधा तयार करण्यात आली आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ईपीएफओच्या ऑनलाइन तक्रारींचं समाधान पोर्टल (EPFIGMS Portal), सीपीजीआरएएमएस (CPGRAMS), सोशल मीडिया प्‍लेटफॉर्म फेसबुक आणि ट्विटर, 24 तास काम करणारे कॉल सेंटर्स ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहेत. (epfo launches whatsapp helpline service to resolve complaints list of numbers helpine number)

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ईपीएफओने आपल्या ग्राहकांपर्यंत आणखी सहजरित्या पोहोचण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन सर्व्हिस सुरू केली आहे. या प्रणालीला सुरू करण्यामागे ग्राहकांचं हित आणि सुरक्षा आहे. या सुविधेमुळे आता घरबसल्या आपण ईपीएफओसंबंधी कोणतीही माहिती आणि मदत मिळवू शकतो.

सर्व 138 कार्यालयांमध्ये व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन सुरू
व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन सर्व्हिसच्या माध्यमातून ग्राहक व्यक्तिगत पातळीवर त्यांच्या जवळील कार्यालयाशी थेट संपर्क साधू शकतात. आता ईपीएफओने त्यांच्या सगळ्या 138 क्षेत्रातील कार्यालयांमध्ये ही सर्व्हिस सुरू केली आहे. यामुळे ग्राहक त्यांच्या खात्यांसंबंधी कोणतीही माहिती आणि अपडेट घर बसल्या मिळवू शकतात. तुम्हाला काही तक्रार असेल तर त्यादेखील तुम्ही या सर्व्हिसच्या माध्यमातून सोडवू शकता.

आता व्हॉट्सअ‍ॅपद्वारे सोडवल्या जातील समस्या
ईपीएफओने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरून सर्व स्थानिक कार्यालयांचे व्हॉट्सअ‍ॅप नंबर जारी केली आहेत. ग्राहकांनी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे विचारलेल्या प्रश्नांना तात्काळ योग्य उत्तर देण्यासाठी एक खास टीम तयार करण्यात आली आहे. सगळ्यात खास बाब म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन सर्व्हिस करताच ईपीएफओने आतापर्यंत 1,64,040 पेक्षाही जास्त ग्राहकांच्या प्रश्नांना उत्तर दिलं आहे. तर व्हॉट्सअ‍ॅप सर्व्हिस सुरू झाल्यामुळे फेसबूक आणि ट्विटरसारख्या सोशल माध्यमांवर तक्रारींचं प्रमाण 30 टक्के कमी झालं आहे.

महाराष्ट्रातील ग्राहकांसाठी हेल्पलाईन नंबर खालीलप्रमाणे:

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Get real time updates directly on you device, subscribe now.

x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com