आता दस्तऐवज जमा न करता काही मिनिटांत मिळवा पॅन, तेही विनामूल्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॅनकार्डसाठी तुम्हाला आता कार्यालयांचे हेलपाटे मारण्याची गरज नाही. प्राप्तिकर विभागाने त्वरित पॅन मिळविण्यासाठी ई-पॅन सुविधा सुरू केली आहे. या सुविधेअंतर्गत अर्जदारांना पॅन पीडीएफ स्वरुपात दिले जाईल, जे अगदी विनामूल्य असेल. प्राप्तिकर विभागाच्या वेबसाइटनुसार, ई-पॅन किंवा इन्स्टंट पॅनसाठी अर्ज करणार्‍या व्यक्तीकडे वैध आधारकार्ड असायला हवं तसेच आपला मोबाइल नंबर आधारशी जोडलेला असावा.

पॅसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला प्राप्तिकर विभागाच्या ई-फाईलिंग वेबसाइटवर (www.incometaxindiaefiling.gov.in) आणि ‘इन्स्टंट पॅन थ्रु आधार’ वर क्लिक करावे लागेल. यानंतर ‘न्यू पॅन’ वर क्लिक करून तुम्हाला तुमच्या आधार कार्डमध्ये लिहिलेला नंबर भरावा लागेल. त्यानंतर, आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल, जो आपल्याला मजकूर बॉक्समध्ये प्रविष्ट करावा लागेल आणि सबमिट पर्याय दाबावा लागेल. यानंतर एक पावती तयार होईल, ज्यावर एक नंबर लिहिला जाईल.

पॅन डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला ‘चेक स्टेटस ऑफ’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर, आधार नंबर प्रविष्ट करून सबमिट करावा लागेल त्यानंतर आपल्या मोबाइलवर ओटीपी येईल. सबमिट केल्यानंतर तुम्ही पॅन तयार झाला की नाही ते तपासू शकता. पॅन मिळाल्यानंतर डाऊनलोडवर क्लिक करून ई-पॅनची पीडीएफ मिळवू शकता.

प्राप्तिकर विभागाच्या वेबसाइटनुसार तुम्हाला ई-पॅनसाठी कोणत्याही प्रकारचे दस्तऐवज अपलोड करण्याची आवश्यकता नाही. या सुविधेद्वारे तुम्हाला 10 मिनिटांत पॅन मिळू शकेल.एवढेच नाही तर त्याची मान्यता फिजिकल पॅनकार्डच्या समानच असेल.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment