पुन्हा वाढल्या सोन्या चांदीच्या किंमती, जाणुन घ्या आजचे भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे सध्या सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये सतत चढ-उतार होत आहेत.मात्र सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये आज प्रचंड वाढ झाली आहे.१४ एप्रिल २०२० रोजी सोन्याचा दर १० ग्रॅमसाठी सुमारे २.१२ टक्क्यांनी वाढून ४६,२५५ रुपये इतका झाला.त्याचबरोबर चांदीचा दर ०.५१ टक्क्यांनी वाढून सुमारे ४३,७२५ रुपये प्रति किलो इतका झाला आहे.

 दिल्ली, मुंबई पासून ते अहमदाबाद पर्यंत २४ कॅरेट सोन्याचे भाव जाणून घ्या

बिझनेस वेबसाइट गुड रिटर्न्सनुसार, आज नवी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याची किंमत दहा ग्रॅमला सुमारे ४३,९३० रुपये आहे. चेन्नईमध्ये सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम सुमारे ४४,५१० रुपये आहे. कोलकातामध्ये सोन्याचा दर प्रति १० ग्रासाठी ४४,७८० रुपये आहे. मुंबईत सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम सुमारे ४३,९३० रुपये आहे. बेंगळुरूमध्ये सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम सुमारे ४३,११० रुपये आहे. हैदराबादमध्ये सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम सुमारे ४४,५१० रुपये आहे. नागपुरात सोन्याची किंमत दहा ग्रॅमसाठी ४३,९३० रुपये आहे तर विशाखापट्टणममध्ये सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम सुमारे ४४,५१० रुपये इतका आहे.

आज २२ कॅरेट सोन्याची किंमत काय आहे?

२२ कॅरेट सोन्याच्या किंमतीबद्दल बोलायचे तर चेन्नईमध्ये सोन्याचा दर दहा ग्रॅमसाठी ४०,८५० रुपये आहे. मुंबईत आज सोन्याचा भाव दहा ग्रॅमसाठी ४२,९३० रुपये आहे. दिल्लीतील सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅमला सुमारे ४३,१३० रुपये आहे. कोलकाता येथे सोन्याचा दर दहा ग्रॅमसाठी ४२,००० रुपये आहे. बंगळुरूमध्ये ते प्रति दहा ग्रॅमसाठी सुमारे ३९,५२० रुपये आहे.

सराफा बाजार म्हणजे काय?

सोने-चांदी अशा मौल्यवान धातू सराफा बाजारातून खरेदी केल्या जातात. सोने खरेदीचे दोन मार्ग आहेत. लोक सहसा सराफा बाजारातून सोन्याची खरेदी करतात. त्याचबरोबर व्यवसायातील लोक वायदा बाजारातून सोन्याची खरेदी करतात. हा एक बाजार आहे जिथे वायदे बाजारात(फ्यूचर मार्केट) सोन्या-चांदीचा व्यापार होतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment