IDBI Bank ने सणांच्या आधी केली WhatsApp सर्विस, आता आपण 24 तास घेऊ शकाल ‘या’ सेवांचा लाभ

हॅलो महाराष्ट्र । आयडीबीआय बँक लिमिटेडने आपल्या ग्राहकांसाठी WhatsApp वर बँकिंग सेवा सुरू केली आहे. बँकेने आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी ही सुविधा सुरू केली असून सर्व ग्राहकांना बेसिक बँकिंग सेवा सहज मिळू शकतात. आयडीबीआय बँक लिमिटेडने ही सुविधा देशभर सुरू केली आहे. दुसर्‍या शहरात राहूनही ग्राहक या सुविधेचा वापर करू शकतात.

WhatsApp बँकिंगवर कोणती सेवा मिळणार – आयडीबीआय बँकेचे सर्व ग्राहक WhatsApp बँकिंगचा फायदा घेऊ शकतील. यासाठी ग्राहकाला त्याच्या फोनमध्ये WhatsApp नंबर सेव्ह करावा लागेल आणि त्याने दिलेला WhatsApp नंबर बरोबर आहे याची खात्री करुन घ्यावी लागेल.

तरच ग्राहक या सेवा वापरू शकतील. WhatsApp बँकिंग सेवेमध्ये ग्राहकांना खात्यात शिल्लक माहिती, शेवटचे पाच ट्रान्सझॅक्शन, चेक बुकसाठी रिक्वेस्ट, ईमेलद्वारे स्टेटमेंट, व्याज दर तसेच जवळच्या आयडीबीआय बँक शाखा व एटीएम यासारख्या आवश्यक बँकिंग सेवा पुरविल्या जातील. या सुविधेचा लाभ (24X7) घेता येईल.

ग्राहकांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेली WhatsApp बँकिंग सेवा सुरू करताना आयडीबीआय बँकेचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राकेश शर्मा म्हणाले, ‘आयडीबीआय बँक नेहमीच काळजी घेते की, ग्राहकांना अधिक चांगला बँकिंग सेवेचा अनुभव मिळाला पाहिजे. WhatsApp बँकिंग सेवेची सुरूवात करणेहे देखील या दिशेने आणखी एक उपक्रम आहे. ज्याद्वारे आयडीबीआय बँकेचे उद्दीष्ट ग्राहकांना त्यांच्या घरी सुरक्षितपणे बेसिक बँकिंग सेवा प्रदान करणे आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com