पाच वर्षात ५ अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था बनणं अशक्य : सी. रंगराजन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र । आज आपल्या देशाची अर्थव्यवस्था २.७ अब्ज डॉलर्सची आहे. पुढील पाच वर्षात आपण देशाची अर्थव्यवस्था ५ अब्ज डॉलर्स करण्याच्या गोष्टी करत आहोत. हे लक्ष्य गाठण्यासाठी वार्षिक नऊ टक्के दरानं विकास होण्याची आवश्यकता आहे. अशातच २०२५ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ५ अब्ज डॉलर्सची होण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर सी. रंगराजन यांनी व्यक्त केलं. एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

यापूर्वीच दोन वर्षे वाया गेली आहेत. यावर्षी विकासदर सहा टक्क्यांपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. तक पुढील वर्षी विकासदर सात टक्क्यांपर्यंत जाईल. त्यानंतर आपल्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असं रंगराजन यावेळी म्हणाले. देशाचा जीडीपी ५ हजार अब्ज डॉलर्स राहिला तर आपले दरडोई उत्पन्न १ हजार ८०० डॉलर्सवरून ३ हजार ६०० डॉलर्स म्हणजेच दुप्पट होईल. यानंतर भारत विकसित देश न होता निम्न मध्यम उत्पन्न असलेल्या देशांच्या यादीत राहिल. ज्या देशातील दरडोई उत्पन्न हे १२ हजार डॉलर्स असते तो देश विकसित देश म्हणून ओळखला जातो, असंही त्यांनी नमूद केलं.

Leave a Comment