‘जिओ’ने बंद केले दोन स्वस्त डेटा पॅक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी । जिओ व्यतिरिक्त अन्य कोणत्याही क्रमांकावर फोन केल्यास सहा पैसे प्रति मिनिट इंटरकनेक्ट युजेस चार्ज दर आकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता रिलायंस जिओने आपल्या ग्राहकांना अजून एक दणका दिला आहे. कंपनीने १९ रुपये आणि ५२ रुपयांचे दोन स्वस्त प्रिपेड रिचार्ज पॅक बंद केलेत. अनुक्रमे एक दिवस आणि सात दिवस इतकी या दोन्ही पॅकची वैधता होती. हे पॅक बंद झाल्यामुळे आता ग्राहकांना किमान ९८ रुपयांचा कॉम्बो-पॅक रिचार्जसाठी उपलब्ध असणार आहे.

बंद केलेल्या १९ रुपयांच्या रिचार्जवर अमर्यादित कॉलिंग आणि १५० एमबी डेटा मिळत होता. तसेच त्याशिवाय २०  एसएमएसची सुविधाही देण्यात आली होती. दुसरीकडे ५२ रुपयांच्या रिचार्जवर ग्राहकाला १ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलची सुविधा मिळते. त्याशिवाय ७० एसएमएसचाही लाभ मिळत होता. परंतु जिओनं आता हे दोन्ही प्लॅन्स बंद केले आहेत.

आययूसी दरांबाबत घोषणा केल्यानंतर कंपनीने १० ऑक्टोबर रोजी इंटरकनेक्ट युजेस चार्ज अंतर्गत टॉपअप प्लॅन भारतीय बाजारात उपलब्ध करून दिले होते. जिओव्यतिरिक्त अन्य नेटवर्क क्रमांकावर फोन करण्याचे प्रमाण अधिक असलेले ग्राहक त्या टॉपअप प्लॅन्सद्वारे रिचार्ज करु शकतात. युजर्ससाठी १० ते १००० रुपयांचे आययूसी टॉप-अप रिचॅर्ज पॅक उपलब्ध आहेत. दरम्यान, बंद केलेले दोन्ही रिचार्ज प्लॅन कंपनी २०२० मध्ये पुन्हा लाँच करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसंच, १ जानेवारी २०२० पासून ट्राय आययूसी दर हटवण्याचीही शक्यता आहे. मात्र, अद्यापपर्यंत ट्रायकडून आययूसीबाबत काहीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Leave a Comment