लक्ष द्या! १ जुलैपासून आर्थिक व्यवहारांविषयी होणार ‘हे’ महत्त्वाचे बदल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली ।  देशभरात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनलॉकच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात करण्यात येत आहे. एकिकडे कोरोनाशी सारा देश लढत असतानाच दुसरीकडे स्वयंपाकघरापासून ते बँक खात्यापर्यंत असणारी सारी गणितं बदलण्याची चिन्हं आहेत. कोरोनाच्या संकटात सरकारकडून मिळालेल्या सवलती आजपासून बंद होणार आहेत. तसेच काही अन्य आर्थिक व्यवहारांत महत्त्वाचे बदल होणार आहेत.

एटीएम व्यवहारांत सूट मिळणार नाही
बुधवारपासून कोणत्याही बँक खातेधारकाला एटीएम कार्डनं व्यवहार केल्यास कोणत्याही प्रकारची सवलत मिळणार नाही आहे. यापूर्वीप्रमाणंच दर महिन्याला मेट्रो शहरांमध्ये आठ आणि नॉन मेट्रो शहरांमध्ये कार्डनं दहा वेळाच व्यवहार करता येणार आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी एटीएममधून असिमीत व्यवहार करण्याची मुभा देण्यात आली होती.

खात्यात मिनिमम बँलेंसची अट पुन्हा लागू
खातेधारकांना अमुक एका बँकेकडून आखून दिलेल्या नियमांनुसार किमान रक्कम ठेवावी लागणार आहे. लॉकडाऊनदरम्यान किमान रकमेची अट शिथिल करण्यात आली होती. पण, आता मात्र हा नियम पूर्ववत करण्यात येणार आहे.

बँक व्याजदरात घट
बँकखात्याच्या बाबतीत होणारा सर्वात मोठा बदल असणार आहे तो म्हणजे व्याजदर. पंजाब नॅशनल बँकमधील खातेधारकांना मिळणाऱ्या व्याजदरात ०.५० टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे.

खातं फ्रीज होण्याची शक्यता
अनेक बँकांमध्ये आवश्यक ती कागदपत्र जमा न केल्यास खातेधारकांची खाती बँकेक़डून फ्रिज करण्यात येणार आहेत. बँक ऑफ बडोदा, विजया बँक, देना बँकेत हे नियम लागू करण्यात आले आहेत.

पीएफचे पैसे काढण्याची अखेरची तारीख
कोरोना काळात केंद्र सरकारकडून पीएफचे पैसे काढण्यासाठीच्या काही नियमांमध्ये शिथिलता दिली होती. पण, या सुविधा फक्त ३० जूनपर्यंतच लागू होत्या. त्यामुळं जुलै महिन्यापासून ही सुविधा उललब्ध नसणार आहे.

गॅस सिलेंडरच्या दरांत बदल
तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी आणि हवाई इंधनाच्या नव्या दरांची घोषणा करतं. गेल्या काही महिन्यांपासून या दरांचा चढता आलेख पाहायला मिळाला आहे. त्याच धर्तीवर आता एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरांतही महत्त्वाचे बदल होणं अपेक्षित आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment