बजाजचा लोकप्रिय चेतक स्कूटर पुन्हा बाजारात; जाणून घ्या वैशिष्ट्ये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । आधुनिक भारताच्या औद्योगिक प्रगतीच प्रतीक म्हणून बजाजच्या चेतक स्कूटरकडे आजही पाहिलं जात. ‘बुलंद भारत की बुलंद तसबीर’ अशी जाहिरात करून भारतीयांच्या मनावर गारुड केल होत. मात्र, काळाच्या ओघात कालबाह्य झालेल्या बजाजचा चेतक स्कूटर पुन्हा बाजारात पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. येणाऱ्या १४ जानेवारी रोजी नव्या युगाची साधर्म्य सांगणारी बजाज चेतक इलेक्ट्रीक स्कूटर बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

ही आहेत वैशिष्ट्ये 
बजाज चेतकमध्य 4kW इलेक्ट्रीक मोटर आणि IP67 रेटेड लिथियम आयन बॅटरी पॅक असणार आहे. बॅटरी रिमुव्हबेल नाही. त्याशिवाय स्कूटरमध्ये दोन रायडिंग (इको आणि स्पोर्ट) मोड असणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. एकदा चार्ज केल्यानंतर इको मोडमध्ये ९५ किमी आणि स्पोर्ट मोड ८५ किमी पर्यंत स्कूटर धावू शकणार आहे.

किंमत काय असणार?
बजाज चेतक इलेक्ट्रीक स्कूटरची किंमत १ लाख २० हजार रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. बाजारपेठेत बजाज चेतक स्कूटरची स्पर्धा आय-प्रेज आणि अथर ४५० स्कूटरसोबत असणार आहे. लाँचिंग सोहळ्यातच या स्कूटरची किंमत जाहीर होईल.

या रंगात मिळणार चेतक
चेतक स्कूटर इलेक्ट्रिक बॅण्ड अर्बनाइट अंतर्गत सादर करण्यात आली आहे. स्कूटरचा लूक प्रीमियम आहे. रेट्रो लूक असणाऱ्या स्कूटरमध्ये कर्वी बॉडीवर्क, मल्टि स्पोक अलॉय विल्ज, स्विचगिअर, फुल एचडी लाइटिंग आणि डिजीटल कंसोल आहे. आरसा, साइड स्टॅण्ड आमि फूट पेग्स सारख्या ठिकाणी उच्च दर्जाच्या वस्तू वापरण्यात आल्या आहेत. स्कूटरच्या आसनावर कॉन्ट्रासट स्टिचिंग आहे.

Leave a Comment