दूरसंचार कंपन्यांकडून ग्राहकांच्या खिशाला कात्री !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र| रिलायन्स जिओ ने दूरसंचार क्षेत्रात पाऊल ठेवल्यानंतर मोठी क्रांती घडवली. याचा फटका इतर कंपन्यादेखील बसला. स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी इतर कंपन्यांनी देखील आपला मोबाइल प्लॅन कमी पैश्यांमध्ये देण्यास सुरुवात केली. मात्र यामध्ये काही कंपन्यांना मोठा तोटा झाल्याचे देखील पाहण्यात आले. याच पार्श्वभूमीवर दूरसंचार क्षेत्रातील कंपन्या आता भाव वाढ करणार आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान दुरसंचार क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्या असणाऱ्या व्होडाफोन- आयडिया आणि ‘भारती एअरटेल’ने मंगळवार, ३ डिसेंबरपासून मोबाइल सेवेच्या प्रिपेड शुल्कात सुमारे ५० टक्क्यांपर्यंतवाढ करण्याचे जाहीर केले. त्यापाठोपाठ सर्वात स्वस्त दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या ‘रिलायन्स जियो’नेही ६ डिसेंबरपासून सुमारे ४० टक्के दरवाढीची घोषणा केली आहे.

रिलायन्स जिओच्या स्पर्धेत आतापर्यंत तुलनेने कमी दर ठेवून तग धरलेल्या व्होडाफोन-आयडिया आणि भारती एअरटेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या प्रिपेड दरवाढीमुळे संभाषण आणि मोबाइल इंटरनेट वापराचे दर जवळजवळ दुप्पट होणार आहेत. तसेच मोबाइल जोडणी महिनाभर अतूट राहावी यासाठी दोन्ही कंपन्यांच्या ग्राहकांना किमान ४९ रुपयांचा ‘रिचार्ज’ करणे आवश्यक आहे.

Leave a Comment