गेल्या 3 महिन्यांपासून तुमच्या खात्यात गॅसचे अनुदान न मिळण्यामागचे ‘हे’ आहे कारण, सरकारने घेतला मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्याला माहिती आहे काय की, मागील 3 महिन्यांपासून Gas Subsidyचे पैसे आपल्या खात्यात येत नाहीत. मीडिया रिपोर्टनुसार मे 2020 पासून घरगुती एलपीजी गॅसवरील सब्सिडी तुमच्या बँक खात्यात येत नाही. मेपासून तुम्हाला मिळणारी गॅस सबसिडी सरकारने रद्द केली आहे. मात्र ही सब्सिडी संपविण्याचा निर्णय का घेण्यात आला आहे. चला तर मग संपूर्ण प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात.

घरगुती एलपीजी सिलिंडर अनुदानाची रक्कम खात्यात का येत नाही – इंग्रजी वृत्तपत्र इकॉनॉमिक टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार केंद्र सरकारने घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमती मे महिन्यात बदलल्यानंतरच गॅस सबसिडी संपविण्याचा निर्णय घेतला. यामुळे मे, जून आणि जुलैमधील गॅस वापरामुळे सब्सिडीची रक्कम ग्राहकांना ट्रांसफर केली गेली नाही.

गॅस सिलिंडरचा बाजारभाव किंवा सब्सिडीशिवाय सिलिंडर्सची किंमतीत लक्षणीय घट झाली आहे. दरम्यान, अनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहेत. या प्रकरणात, दोन सिलिंडरमधील किंमतीतील फरक जवळजवळ संपला आहे. यामुळेच सरकारने आता घरगुती गॅस सिलिंडरला सब्सिडी देणे बंद केले आहे.

काय झाला सब्सिडी संपविण्याचा परिणाम – एलपीजी सिलिंडर्सवरील सब्सिडी गेल्या एक वर्षापासून सातत्याने कमी केले जात आहे. म्हणूनच अनुदानित सिलिंडर 100 रुपयांनी महाग झाले आहे. यासह, त्यावर मिळणारे अनुदान शून्यावर आले आहे. देशाच्या राजधानी दिल्लीत गेल्या वर्षी जुलैमध्ये 14.2 किलो एलपीजी सिलिंडरचा बाजारभाव हा 637 रुपये होता, जो आता आणखीनच खाली घसरला आहे. जर तुम्हाला यापेक्षा जास्त सिलिंडर हवे असतील तर तुम्हाला बाजारभावाने खरेदी करावे लागतील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठीआम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment