Work from anywhere: आता जगाच्या पाठीवर कोठूनही करा ऑफिसची कामे, ‘या’ कंपनीने बनवली नवीन योजना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी स्टील कंपनी असलेल्या टाटा स्टील आपल्या कर्मचार्‍यांना मोठा दिलासा देऊ शकते. कंपनी लवकरच आपल्या कर्मचार्‍यांसाठी ‘Work from anywhere’ पॉलिसी सुरू करणार आहे. या पॉलिसी अंतर्गत कर्मचारी जगाच्या पाठीवर कुठूनही आपले ऑफिसचे कामे करू शकतील. ही पॉलिसी महामारी थांबल्यानंतरही सुरूच राहणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनी सुरुवातीला ही सुविधा 10 टक्के कर्मचार्‍यांनाच देईल आणि नंतर याचा निकाल पाहिल्यानंतरच ही सुविधा आणखी 30 टक्के कर्मचार्‍यांना देण्यात येईल.

रिअल इस्टेट खर्चामध्ये कंपनी बचत करेल
यावेळी कंपनीत सुमारे 7000 लोक काम करतात. या पॉलिसी मुळे कंपनी रिअल इस्टेटवरील खर्चात मोठी बचत करू शकणार आहे. कंपनीच्या उर्वरित व्हाइट -कॉलर कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होम साठी मर्यादित सुविधा असतील.

ही पॉलिसी नोव्हेंबरपासून लागू केली जाईल
इंग्रजी वृत्तपत्र इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार कंपनीचे ही पॉलिसी नोव्हेंबरपासून अंमलात येत आहे. टाटा स्टीलमध्ये देशभरात सुमारे 32,000 कायमस्वरुपी आणि 55,000 तात्पुरते कर्मचारी काम करतात.

कंपनीच्या VP नी दिली माहिती
टाटा स्टीलच्या HR चे उपाध्यक्ष एएस सान्याल यांच्या म्हणण्यानुसार, पूर्वीच्या काळात कर्मचार्‍यांची फिजिकल उपस्थिती खूप महत्वाची होती, परंतु कोरोना संकटापासून ही प्रवृत्ती बदलली आहे. ते म्हणाले की, सुरुवातीला आयटी सपोर्ट, डिजिटल मार्केटींग, स्ट्रेटेजी अँड प्लॅनिंग, प्रोक्योरमेंट, क्वालिटी मॅनेजमेंट, सेल्स आणि एचआर कर्मचारी हे या Work from anywhere अंतर्गत येतील.

लर्निंग पीरियड एक वर्षाचा असेल
यासह ते म्हणाले की हि पॉलिसी विश्वासाच्या जोरावर काम करेल. सुरुवातीला सुमारे एक वर्षाचा कालावधी असेल. त्यानंतर, कंपनी स्ट्रक्चर आणि काम करण्याची क्षमता यासारख्या मुद्द्यांचा विचार करेल आणि काम कसे केले जात आहे हे पाहिल.

मायक्रोसॉफ्टमध्येही ‘ही’ पॉलिसी अंमलात आली
मायक्रोसॉफ्ट या दिग्गज सॉफ्टवेअर कंपनीने आपल्या वर्क फ्रॉम होम पॉलिसीच्या विस्ताराची घोषणा केली आहे. कंपनीने बर्‍याच लोकांसाठी कायमचे वर्क फ्रॉम होम पॉलिसी लागू केली आहे. कंपनीने जारी केलेल्या हायब्रीड वर्क प्लेस गायडन्स मध्ये कर्मचारी कसे फ्लेक्सिबल रिमोट वर्क शेड्यूल सेट करू शकतात हे स्पष्ट करते. तसेच, कर्मचारी देशात कोठेही आपले लोकेशन बदलू शकतात. पॉलिसीतील हा बदल कोरोना साथीच्या आजारात उद्भवणार्‍या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी केला गेला आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 8080340221 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. 

Leave a Comment